श्री क्षेत्र खर्डे ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचे प्रस्थान
देवळा ; श्रीक्षेत्र खर्डे ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचे हे ३४ वे वर्ष असून, या पायी दिंडीचे खर्डे ता. देवळा येथून बुधवार दि. ३१ रोजी प्रस्तान झाले. दिंडीत सामील झालेल्या भाविक भक्तांना यावेळी गावकऱ्यांनी भक्तिमय वातावरणात निरोप देऊन दिंडी मार्गस्थ झाली.
या पायी दिंडीचा खर्डे, धोडंबा, गोहरण, वडनेर भैरव, पिंपळगाव बसवंत, कोकणगाव, ओझर, आडगाव, नाशिक, सातपूर, पिंपळगाव बहुला, महिरावणी व त्रंबकेश्वर असा मार्गक्रम असणार असून भाविकांना ठीक ठिकाणी सकाळी, दुपारी, सायंकाळी, रात्री चहा नाश्ता, जेवणाची व्यवस्था संबंधित दानशूरांकडून करण्यात आली आहे. दिंडीत मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष, अबाल वृद्धांचा समावेश आहे.
खर्डे येथे सकाळी देविदास अलई, कृष्णा जाधव यांच्या कडून नास्ता, चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मुक्कामाच्या ठिकाणी रोज भजन, कीर्तन होईल.
मंगळवारी दि. ६ रोजी त्र्यंबकेश्वर येथील यात्रेनिमित्त भाविक संत निवृत्तीनाथ महाराजांचे दर्शन घेतील व बुधवार दि. ७ रोजी सकाळी ९ वाजता ह भ प पुंडलिक महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाल्यावर भाविकांना महाप्रसाद वाटप करून दिंडी परतीच्या प्रवासाला निघेल.
हेही वाचा :
Jacqueline Fernandez : ‘जॅकलिनने जाणुनबुजून सुकेश चंद्रशेखरच्या पैशांचा वापर केला’
जळगाव : जिल्ह्यातील आदिवासी पाड्या – वस्त्यांना जोडण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार – मंत्री विजयकुमार गावित
Latest Marathi News श्री क्षेत्र खर्डे ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचे प्रस्थान Brought to You By : Bharat Live News Media.