संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे ठेकेदार नंदकिशोर कामथे यांचे निधन
शेळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : बारामती ते इंदापूर श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे ठेकेदार व खळद (ता. पुरंदर) येथील प्रसिध्द उद्योजक, पुणे येथील आर. एस. कामथे इन्फास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक नंदकिशोर शंकरराव कामथे उर्फ आण्णा यांचे बुधवारी (दि. ३१) उपचारादरम्यान अल्पशा आजाराने पहाटे निधन झाले. मागील अनेक दिवसापासून ते पुणे येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. मात्र बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, दोन पुतणे असा परिवार आहे. आर. एस. कामथे कंपनीचे संचालक तसेच उद्योजक यश कामथे यांचे ते वडील तर महेश कामथे यांचे ते चुलते होत.
नंदकिशोर कामथे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती ते इंदापूर दरम्यान श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम अत्यंत जलद गतीने व उत्तम दर्जेदार काम केल्याने आर. एस. कामथे कंपनीचे कौतुक होत आहे. नंदकिशोर कामथे यांना इंदापूर तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, कृषी क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी श्रध्दांजली अर्पण केली आहे.
Latest Marathi News संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे ठेकेदार नंदकिशोर कामथे यांचे निधन Brought to You By : Bharat Live News Media.
