चंद्र का आकसत आहे?

वॉशिंग्टन : लहानपणी ऐकलेल्या एका गोष्टीत चांदोमामाला शर्ट का शिवून मिळत नाही हे सांगितले होते. पंधरा दिवस चंद्र मोठा होत जातो आणि पंधरा दिवस लहान होत जातो, त्यामुळे कोणताही शर्ट त्याच्या मापाला येत नाही असा या गोष्टीचा सूर होता. अर्थात हे सर्व पृथ्वीवरून दिसणार्‍या चंद्राच्या कलांबाबत आहे. मात्र वास्तवातही चंद्र आकसू लागला असल्याचे खगोलशास्त्रज्ञांचे म्हणणे … The post चंद्र का आकसत आहे? appeared first on पुढारी.

चंद्र का आकसत आहे?

वॉशिंग्टन : लहानपणी ऐकलेल्या एका गोष्टीत चांदोमामाला शर्ट का शिवून मिळत नाही हे सांगितले होते. पंधरा दिवस चंद्र मोठा होत जातो आणि पंधरा दिवस लहान होत जातो, त्यामुळे कोणताही शर्ट त्याच्या मापाला येत नाही असा या गोष्टीचा सूर होता. अर्थात हे सर्व पृथ्वीवरून दिसणार्‍या चंद्राच्या कलांबाबत आहे. मात्र वास्तवातही चंद्र आकसू लागला असल्याचे खगोलशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अर्थात याबाबत पृथ्वीवासीयांना चिंता करण्याची गरज नाही. याबाबतचे संशोधन करणार्‍या मेरिलँड युनिव्हर्सिटीच्या निकोलस श्मेर यांनी म्हटले आहे की ग्रहण, पौर्णिमा किंवा भरती-ओहोटीसारख्या घटनांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.
याबाबतच्या संशोधनानुसार गेल्या लाखो वर्षांच्या काळात चंद्राचा परिघ केवळ 150 फूट आकसला आहे. याचे कारण म्हणजे चंद्राचा कोअर किंवा गाभा हा हळूहळू थंड होत आहे. चंद्राचा हा उष्ण अंतर्भाग हळूहळू थंड होत असल्याचे संशोधनात आढळून आले होते. परिणामी चंद्र आकसत असून चांद्रभुमीवर रेखा किंवा भेगा पडू लागल्या आहेत. श्मेर यांनी सांगितले की, चंद्र आकसत असला तरी त्याचे वस्तुमान बदलत चाललेले नाही, ही महत्त्वाची गोष्ट आहे.
त्यामुळे भरती-ओहोटीवर त्याच्या आकसण्याचा कोणताही परिणाम होणार नाही. अर्थात चंद्रावर भूकंपाचे धक्के बसू शकतात व तिथे गेलेल्या अंतराळवीरांसाठी ही बाब चिंताजनक ठरू शकते. चंद्राच्या आकसण्यामुळे त्याच्या दक्षिण ध—ुवाच्या पृष्ठभागावर परिणाम झालेला आहे. याच ठिकाणी ’नासा’ने ’आर्टेमिस-3’ या मोहिमेतील अंतराळवीरांच्या लँडिंगचे नियोजन केलेले आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘प्लॅनेटरी सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Latest Marathi News चंद्र का आकसत आहे? Brought to You By : Bharat Live News Media.