Pune : झोपडपट्टी हटविल्याने तणाव

पुणे/बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा :  मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकाजवळच्या आनंदनगर झोपडपट्टीवर महापालिकेने मंगळवारी तगड्या पोलिस बंदोबस्तात कारवाई केली व या कारवाईत झोपड्या हटविल्या. दरम्यान, पुनर्वसन न करता बिल्डरच्या मोठ्या प्रकल्पासाठी महापालिकेने नोटीस न देता कारवाई केल्याचा आरोप करत रहिवाशांनी आंदोलन केले. मात्र, पोलिसांनी रहिवाशांना ताब्यात घेत आंदोलन मोडून काढले. यामुळे या परिसरात काही काळ … The post Pune : झोपडपट्टी हटविल्याने तणाव appeared first on पुढारी.

Pune : झोपडपट्टी हटविल्याने तणाव

पुणे/बिबवेवाडी : Bharat Live News Media वृत्तसेवा :  मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकाजवळच्या आनंदनगर झोपडपट्टीवर महापालिकेने मंगळवारी तगड्या पोलिस बंदोबस्तात कारवाई केली व या कारवाईत झोपड्या हटविल्या. दरम्यान, पुनर्वसन न करता बिल्डरच्या मोठ्या प्रकल्पासाठी महापालिकेने नोटीस न देता कारवाई केल्याचा आरोप करत रहिवाशांनी आंदोलन केले. मात्र, पोलिसांनी रहिवाशांना ताब्यात घेत आंदोलन मोडून काढले. यामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. गंगाधाम चौकामध्ये एका बिल्डरची मोठी बांधकाम साईट सुरू आहे. शेकडो सदनिका आणि मोठ्या व्यावसायीक मार्केटचे काम सुरू आहे. नेमके या साईटसमोरील बिबवेवाडी-कोंढवा रस्त्याच्या कडेला आनंदनगर ही घोषित झोपडपट्टी आहे. मात्र, ही झोपडपट्टी बाधकाम साईटच्या समोरच असल्याने ती हटविण्यासाठी मागील काही वर्षापासून राजकिय पातळीवरून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
येथील काही नागरिकांचे मागेच बिबवेवाडी येथील हिलटॉप हिलस्लोपवर अनधिकृत बांधकाम करून पुर्नवसन करण्यात आले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपुर्वी महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयामार्फत रस्ता रुंदीकरणामध्ये येणार्या आनंदनगरमधील काही झोपड्या हलविण्याबाबत नोटीसेस देण्यात आल्या होत्या. पुर्नवसन करण्यात आलेल्या झोपडपट्टी वासीयां व्यतिरिक्त काहींना रोखीने मोबदला देण्यात आला आहे. परंतू काहींनी वाढीव मोबदल्याची मागणी केली असून काहींनी मोबदला मिळाला नसल्याचा दावा करत आंदोलन सुरू केले होते.
महापालिकेने मंगळवारी उर्वरीत झोपडया काढण्यासाठी पोलिस बंदोबस्तासह सर्व यंत्रणा कामाला लावून झोपड्या काढण्यास सुरूवात केली. यामुळे नागरिक संतप्त झाले. त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत आंदोलन मोडीत काढले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड, उपअभियंता राजेश फटाले, अतिक्रमन निरीक्षक महेश मारणे, वसाहत विकास अधिकारी विजय शिंदे, मार्केट यार्ड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे महापालिकेचे 50 बिगारी दोन जेसीबी इत्यादींच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली. या कार्यामध्ये दहा हजार स्क्वेअर फुट जागा मोकळी करण्यात आली व स्थानिक बांधकाम व्यवसायिकांनी पत्रे लावून ती ताब्यात घेण्यात आली.
…अन्यथा आंदोलन करू ः डॉ. बाबा आढाव
झोपडपट्टीवर कारवाई करताना ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी तातडीने भेट दिली आणि संबंधित अधिकार्‍यांना सुनावले. आधी योग्य पुनर्वसन, मगच कारवाई करावी; अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल, असा ईशारा डॉ. आढाव यांनी दिला.
आनंदनगर झोपडपट्टीत गेल्यशा तीस वर्षांपासून मी माझे कुटुंब नातेवाईक राहत असून, आमच्या झोपड्या मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी पालिका, पोलिस व स्थानिक राजकारण्यांना हाताशी धरून मला कुठलीही पूर्वसूचना नोटीस न देता माझे घर काढून टाकले आहे. मी उपोषण पुढे चालूच ठेवणार आहे. माझा लढा चालूच राहणार आहे.
                                         – बाबा खंडागळे, स्थानिक रहिवासी, आनंदनगर
आनंदनगर येथे रस्ता रुंदीकरणात येणार्‍या काही झोपडपट्टीवासीयांचे बिबवेवाडी येेथे पुनर्वसन करण्यात आले आहे. तर काहींना रोखीने मोबदला देण्यात आला आहे. लवकरच येथील रस्ता रुंद करण्यात येणार आहे.
                             – अविनाश सकपाळ, झोन तीन, उपायुक्त, महापालिका
Latest Marathi News Pune : झोपडपट्टी हटविल्याने तणाव Brought to You By : Bharat Live News Media.