मोदी सरकारच्या कार्यकाळात २५ कोटी देशवासीय गरिबीतून बाहेर- राष्ट्रपती

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत वेगाने विकसित होणारी मोठी अर्थव्यवस्था असून नवीन संसद भवनाला एक भारत, श्रेष्ठ भारताचा सुवास आहे. भारताची प्रगतीकडे वाटचाल होत आहे. सरकारने नारीशक्ती वंदन अधिनियम लागू केलं. लाखो तरूणांना मागील वर्षात रोजगार मिळाला, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या संसदेतील अभिभाषणात मोदी सरकारच्या धोरणांचा गौरव केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील … The post मोदी सरकारच्या कार्यकाळात २५ कोटी देशवासीय गरिबीतून बाहेर- राष्ट्रपती appeared first on पुढारी.

मोदी सरकारच्या कार्यकाळात २५ कोटी देशवासीय गरिबीतून बाहेर- राष्ट्रपती

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारत वेगाने विकसित होणारी मोठी अर्थव्यवस्था असून नवीन संसद भवनाला एक भारत, श्रेष्ठ भारताचा सुवास आहे. भारताची प्रगतीकडे वाटचाल होत आहे. सरकारने नारीशक्ती वंदन अधिनियम लागू केलं. लाखो तरूणांना मागील वर्षात रोजगार मिळाला, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या संसदेतील अभिभाषणात मोदी सरकारच्या धोरणांचा गौरव केला.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेच्या अखेरच्या अधिवेशनाला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने सुरू झाली. राष्ट्रपती मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. यानिमित्ताने राष्ट्रपतींनी नव्या संसद भवनात पहिल्यांदाच प्रवेश केला.
येत्या काही महिन्यांतच देश लोकसभा निवडणुकीला सामोरे जाईल. त्या दृष्टीने राष्ट्रपती मुर्मू यांच्या संसदेच्या अधिवेशनातील पहिल्या अभिभाषणात मोदी सरकारच्या विविध मुद्द्यांचे प्रतिबिंब उमटले.
गेले वर्ष भारतासाठी ऐतिहासिक कामगिरीने भरलेले राहिले. जगात गंभीर संकट असतानाही भारत सर्वात वेगवान विकसीत होणारी अर्थव्यवस्था बनली. सलग दोन तिमाहीत भारताचा विकास दर ७.५ टक्क्यांच्यावर राहिला. भारत चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर झेंडा फडकावणारा पहिला देश बनला.
निती आयोगाच्या माहितीनुसार, मोदी सरकारने एक दशकाच्या कार्यकाळात सुमारे २५ कोटी देशवासीयांना गरिबीतून बाहेर काढले. ही प्रत्येक गरीबासाठी एक नवा विश्वास निर्माण करणारी गोष्ट आहे. गरिबी हटावचा नारा आपण सर्वजण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. आता आपल्या जीवनात पहिल्यांदाच आपण मोठ्या प्रमाणावर गरिबी दूर होताना पाहत आहोत, असे मुर्मू म्हणाल्या.

हम सभी बचपन से गरीबी हटाओ के नारे सुनते आ रहे थे। अब हम जीवन में पहली बार बड़े पैमाने पर गरीबी को दूर होते देख रहे हैं। pic.twitter.com/Unnc3WRHB8
— President of India (@rashtrapatibhvn) January 31, 2024

केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन उद्या अंतरिम बजेट मांडणार
केंद्र सरकारचे अंतरिम बजेट 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. खरे तर, अर्थमंत्री संपूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार नसून, कामकाजाचा लेखाजोखा तेवढा मांडतील आणि सरकारच्या उर्वरित कालावधीकरिता खर्चासाठी संसदेची मंजुरी घेतील, याला अंतरिम बजेट असे म्हणतात. देशाचा अर्थसंकल्प म्हणजे देशाच्या संपूर्ण आर्थिक वर्षाचा लेखाजोखा. पैसा कोठून येणार आणि सरकार तो कुठे व कसा खर्च करणार याचा हा एक आराखडा असतो. वार्षिक आर्थिक विवरण असेही त्याला म्हणतात. अंतरिम अर्थसंकल्प मात्र सध्याच्या सरकारला नवीन सरकार येईपर्यंत आणि पूर्ण अर्थसंकल्प सादर होईपर्यंत देश चालवण्यासाठी पैसे पुरवतो.
The post मोदी सरकारच्या कार्यकाळात २५ कोटी देशवासीय गरिबीतून बाहेर- राष्ट्रपती appeared first on Bharat Live News Media.

Go to Source