खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
नाशिक (देवळाली कॅम्प): Bharat Live News Media वृत्तसेवा
सिन्नर पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली वाघ यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जात एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. सिन्नर तालुक्याच्या विकासासाठी नेमके काय केले पाहिजे, कोणकोणत्या योजना तालुक्यात राबविणे गरजेचे आहे याविषयी मुख्यमंत्री शिंदे, खासदार गोडसे आणि बाळासाहेब वाघ यांच्यात सविस्तर चर्चा झाली. सिन्नर तालुक्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचे साकडे यावेळी बाळासाहेब वाघ यांनी मुख्यमंत्री महोदयांना घातले.
बाळासाहेब वाघ दहा वर्षांपूर्वी सिन्नर तालुक्यातील नांदूर – शिंगोटे गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. वाघ यांनी तालुका पंचायत समितीचे सभापतीपदही भूषविलेले आहेत. कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत वाघ यांनी शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासोबत निवडणूक लढवली होती. खासदार गोडसे आणि बाळासाहेब वाघ यांची मैत्री जिल्हाभर सर्वश्रृत आहे. आज बाळासाहेब वाघ यांनी खासदार गोडसे यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांनीही वाघ यांची आपुलकीने विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्री, खासदार गोडसे आणि बाळासाहेब वाघ यांच्यात दहा मिनिटे सिन्नर तालुक्याच्या विकासावर चर्चा झाली.
हेही वाचा:
Rishabh Pant : माझा वेळ संपला आहे, असे वाटले..!
Smriti Mandhana : स्मृती मानधनाचे वादळी शतक
Nashik news | विधानसभा उपाध्यक्षांकडून जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची शाळा
Latest Marathi News खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्र्यांची घेतली भेट Brought to You By : Bharat Live News Media.