इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणी १४ वर्षांची शिक्षा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानमधील बहुचर्चित तोशाखाना प्रकरणी माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे संस्थापक इम्रान खान आणि त्‍यांची पत्‍नी बुशरा बीबी यांना आज (दि. ३१ ) १४ वर्षांची शिक्षा सुनावण्‍यात आली आहे, असे वृत्त पाकिस्तानच्या ‘जिओ न्यूज’ने दिले आहे. उत्तरदायित्व न्यायालयाचे न्यायाधीश मुहम्मद बशीर यांनी हा निकाल  दिला. (Imran Khan, Bushra Bibi sentenced to … The post इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणी १४ वर्षांची शिक्षा appeared first on पुढारी.

इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणी १४ वर्षांची शिक्षा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानमधील बहुचर्चित तोशाखाना प्रकरणी माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे संस्थापक इम्रान खान आणि त्‍यांची पत्‍नी बुशरा बीबी यांना आज (दि. ३१ ) १४ वर्षांची शिक्षा सुनावण्‍यात आली आहे, असे वृत्त पाकिस्तानच्या ‘जिओ न्यूज’ने दिले आहे. उत्तरदायित्व न्यायालयाचे न्यायाधीश मुहम्मद बशीर यांनी हा निकाल  दिला. (Imran Khan, Bushra Bibi sentenced to 14 years with rigorous punishment in Toshakhana case )
मंगळवार, ३० जानेवारी रोजीच इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता तोषखाना प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर इम्रानच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ( Imran Khan, Bushra Bibi sentenced to 14 years with rigorous punishment in Toshakhana case ) सध्‍या ७१ वर्षीय इम्रान खान हे रावळपिंडीच्या अडियाला कारागृहात आहेत.
काय आहे तोशाखाना प्रकरण?
२०१८ मध्‍ये पाकिस्‍तानमध्‍ये इम्रान खान यांचे सरकार सत्तेवर आले. या काळात त्‍यांना अरब शासकांकडून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या. भेटवस्तूंमध्ये एक महागडी मनगटी घड्याळ, कफलिंकची एक जोडी, एक महागडा पेन, एक अंगठी आणि चार रोलेक्स घड्याळांचा समावेश होता. त्या तोशाखान्यात (देशातील गोदाम) जमा करण्यात आल्या. नंतर त्यांनी सवलतीच्या दरामध्‍ये त्‍या वस्‍तू विकत घेतल्‍या आणि मोठ्या नफ्यात त्‍याची विक्री करण्‍यात आली, असा आरोप विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्‍यावर केला होता.
इम्रान खान यांनी तोशाखान्यातून २.१५ कोटी रुपयांना विकत घेतल्या आणि त्याच विक्री करुन ५.८ कोटी रुपयांचा नफा कमावला, असा आरोप त्‍यांच्‍यावर होता. या भेटवस्तूंमध्ये एक ग्राफ घड्याळ, कफलिंकची एक जोडी, एक महागडा पेन, एक अंगठी आणि चार रोलेक्स घड्याळांचा समावेश होता.  या प्रकरणाच्‍या सुनावणीवेळी इम्रान यांनी सांगितले होते की, २१,५६ कोटी रुपये भरल्यानंतर राज्याच्या तिजोरीतून खरेदी केलेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून सुमारे ५८ लाख रुपये मिळाले होते. यामध्‍ये कोणताही गैरव्‍यवहार झाला नसल्‍याचा दावाही त्‍यांनी केला होता. या प्रकरणी २८ फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.

Imran Khan, Bushra Bibi sentenced to 14 years with rigorous punishment in Toshakhana case, reports Pakistan’s Geo News. pic.twitter.com/vBd79s3EDh
— ANI (@ANI) January 31, 2024

हेही वाचा : 

ब्रेकिंग! इम्रान खान यांना मोठा धक्का! इम्रान खान, मंत्री शाह महमूद कुरेशी यांना १० वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा
मोठी बातमी : इम्रान खान पाकिस्‍तानच्‍या निवडणुकीतून ‘आऊट’, आयोगाने नामांकन नाकारले
पाकिस्तानी लष्कराची मदत थांबवा; इम्रान खान यांची अमेरिकेकडे याचना

 
Latest Marathi News इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणी १४ वर्षांची शिक्षा Brought to You By : Bharat Live News Media.