जयसिंगपूर येथे 5 दुकांनाना भीषण आग

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : येथील शिरोळ-वाडी रोडवरील पाच दुकानांना आग लागून पुस्तके, वह्या, कापड दुकान, स्टेशनरी दुकानासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला. मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास लागलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी जयसिंगपूर, कुरुंदवाड नगरपालिका, इचलकरंजी महापालिका, दत्त साखर कारखाना, घोडावत उद्योग समुहाच्या अग्निशमन कर्मचार्‍यांनी सुमारे दीड तास शर्थीचे प्रयत्न केले. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक … The post जयसिंगपूर येथे 5 दुकांनाना भीषण आग appeared first on पुढारी.

जयसिंगपूर येथे 5 दुकांनाना भीषण आग

जयसिंगपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : येथील शिरोळ-वाडी रोडवरील पाच दुकानांना आग लागून पुस्तके, वह्या, कापड दुकान, स्टेशनरी दुकानासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला. मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास लागलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी जयसिंगपूर, कुरुंदवाड नगरपालिका, इचलकरंजी महापालिका, दत्त साखर कारखाना, घोडावत उद्योग समुहाच्या अग्निशमन कर्मचार्‍यांनी सुमारे दीड तास शर्थीचे प्रयत्न केले. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (Sangli News)
जयसिंगपूर शहरातील शिरोळ रोडवर रेवनजी चौगुले यांचे चौगुले बुक सेलर्स नावाचे जुन्या- नव्या पुस्तकांची विक्री करणारे दुकान आहे. दुकानाच्या पाठीमागेच त्यांचे साहित्य ठेवण्याचे गोडाऊन आहे. (Sangli News)
तसेच निशांत श्रीखंडे यांचे एसएम कलेक्शन नावाचे कापड विक्री दुकान आहे. लगतच बाबुराव धनवडे पतसंस्था, विराज जनरल स्टोअर्स, चहा विक्रीचे स्टॉल आहेत. मंगळवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत पाचही दुकानांमधील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मंगळवारी सायंकाळपर्यंत जळालेल्या दुकानांमधून धुराचे लोट बाहेर पडत होते. दुकान मालकांना हुंदके आणि अश्रू आवरता आले नाहीत.
फटाक्याच्या आवाजाने जाग
आग लागलेल्या दुकानातून मध्यरात्री फटाके फुटण्याचे आवाज सुरू झाला. मध्यरात्री फटाक्यांचा जोरदार आवाज होऊ लागल्यानंतर परीसरातील नागरीकांनी घरातून बाहेर येऊन पाहताच पाचही दुकानाला आग लागल्याचे दिसले.
हेही वाचा :

संभाजीनगर : ‘स्पा’च्या नावाखालील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; १३ तरुणींची सुटका
अमरावती : जनगणनेच्या बहाण्याने नायब तहसीलदारांच्या घरी पाच लाखांची चोरी
Agniveer Yojana : सैनिकांचा अपमान करणारी ‘अग्निवीर’ योजना रद्द करा : टी. एम. सुर्यवंशी

Latest Marathi News जयसिंगपूर येथे 5 दुकांनाना भीषण आग Brought to You By : Bharat Live News Media.