रत्नागिरी : जिल्ह्यातील भूजल पाणीपातळी स्थिर

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने भूगर्भातील भूजळ पातळी सध्या स्थिर आहे. भूजल विभागाकडून आलेल्या अहवालानुसार मागील पाच वर्षांच्या सरासरीनुसार पाण्याच्या पातळीत किंचित वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्याची भूजल सरासरी पातळी 0.17 मी. इतकी आहे. यामुळे पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर सध्यातरी जिल्हावासीयांना थोडासा दिलासा मिळणार आहे. यंदा मोसमी पाऊस उशिरापर्यंत राहिल्यामुळे … The post रत्नागिरी : जिल्ह्यातील भूजल पाणीपातळी स्थिर appeared first on पुढारी.

रत्नागिरी : जिल्ह्यातील भूजल पाणीपातळी स्थिर

रत्नागिरी; Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्ह्यात या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने भूगर्भातील भूजळ पातळी सध्या स्थिर आहे. भूजल विभागाकडून आलेल्या अहवालानुसार मागील पाच वर्षांच्या सरासरीनुसार पाण्याच्या पातळीत किंचित वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्याची भूजल सरासरी पातळी 0.17 मी. इतकी आहे. यामुळे पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर सध्यातरी जिल्हावासीयांना थोडासा दिलासा मिळणार आहे.
यंदा मोसमी पाऊस उशिरापर्यंत राहिल्यामुळे गतवर्षीपेक्षा पाणी टंचाईची तीव्रता कमी राहील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे यंदा अजूनतरी जिल्ह्यात एकही पाण्याचा टँकर धावलेला नाही.
भूजल पातळीसह मे महिन्यापर्यंत टंचाईची स्थिती काय राहील याचा अंदाज घेण्यासाठी भूजल विभागाकडून सप्टेंबर अखेर सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
या अहवालानुसार मागील पाच वर्षाची सरासरीनुसार 0.17 मी. पाणी सध्या आहे. एकूण 63 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले आहे. भूजल पातळी व्यवस्थित असल्याने यंदा पाणी टंचाईची तीव्रता कमी राहील हे निश्चित. मात्र, जिल्ह्यात काही ठिकाणी स्थानिक पातळीनुसार टँकरची गरज भासू शकते.
प्रत्येक ग्रामपंचायत बांधणार 10 बंधारे…
पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी सिमेंट बंधारे, कच्चे बंधारे बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला गावात किमान 10 बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामुळे किमान साडेआठ हजार बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी सध्या 6 हजार बंधारे बांधण्याचे काम पूर्ण झाल्याची महिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा

Budget Session 2024 : विरोधी खासदारांचे निलंबन रद्द! अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेणार भाग

Latest Marathi News रत्नागिरी : जिल्ह्यातील भूजल पाणीपातळी स्थिर Brought to You By : Bharat Live News Media.