रत्नागिरीत छत्रपती संभाजी महाराज पुतळा अनावरणासाठी खा. उदयनराजे येणार

रत्नागिरी; Bharat Live News Media वृत्तसेवा : रत्नागिरीतील जिजामाता उद्यानात उभारलेल्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांना आणले जाणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यासाठी प्रयत्नशील आहेत. हा पुतळा उभारला गेल्याने तेथील पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे.
रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस पर्यटनस्थळ असून याच ठिकाणी जिजामाता उद्यान आहे. याच उद्यानात सुमारे सव्वा कोटी रुपये खर्चून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी यासाठी सव्वाकोटी रुपये उपलब्ध करून दिले असून रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, बांधकाम अभियंता यतिराज जाधव यांच्या नियंत्रणाखाली हे काम झाले आहे. पालकमंत्र्यांनी सुद्धा वेळोवेळी कामाच्या ठिकाणी भेट देवून पुतळा वेळेत उभारला जावा, यासाठी प्रोत्साहित केले. पुतळ्याच्या ठिकाणी स्थापत्य काम 30 लाख रुपये खर्चाचे असून प्रत्यक्ष पुतळ्याचे काम 95 लाख रुपये खर्चाचे आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण 4 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याला खा. उदयनराजे यांची उपस्थिती लाभावी, यासाठी पालकमंत्री उदय सामंत प्रयत्नशील आहेत. या पुतळ्याच्या लोकार्पणानानंतर या उद्यानात येणार्या पर्यटकांची संख्या वाढणार आहे. पर्यायाने पूरक रोजगाराला चालना मिळणार
आहे.
Latest Marathi News रत्नागिरीत छत्रपती संभाजी महाराज पुतळा अनावरणासाठी खा. उदयनराजे येणार Brought to You By : Bharat Live News Media.
