महाबळेश्वरात चार वर्षांनी फुलली आकरा जातीची कारवीची फुले

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : दर चार वर्षांनी फुलणार्‍या कारवी जातीच्या प्रकारातील आकरा या वनस्पतीला फुले येऊ लागली असून पांढरट आकराच्या फुलांनी महाबळेश्वरचे पठार फुलले आहे. (Satara News) वनस्पती शास्त्रातील या वनस्पतीचे नाव लेपिडोग्याथास कुस्तीडाटा असे आहे. याची फुले पांढर्‍या रंगाची छोटी छोटी असतात. 20-25 टोकदार काट्यांच्या झुपक्यावर ती येतात. मधमाशांच्या परागीभवनासाठी व आतील औषधी मधामुळे … The post महाबळेश्वरात चार वर्षांनी फुलली आकरा जातीची कारवीची फुले appeared first on पुढारी.

महाबळेश्वरात चार वर्षांनी फुलली आकरा जातीची कारवीची फुले

महाबळेश्वर; Bharat Live News Media वृत्तसेवा : दर चार वर्षांनी फुलणार्‍या कारवी जातीच्या प्रकारातील आकरा या वनस्पतीला फुले येऊ लागली असून पांढरट आकराच्या फुलांनी महाबळेश्वरचे पठार फुलले आहे. (Satara News)
वनस्पती शास्त्रातील या वनस्पतीचे नाव लेपिडोग्याथास कुस्तीडाटा असे आहे. याची फुले पांढर्‍या रंगाची छोटी छोटी असतात. 20-25 टोकदार काट्यांच्या झुपक्यावर ती येतात. मधमाशांच्या परागीभवनासाठी व आतील औषधी मधामुळे या प्रकारच्या फुलोर्‍याला विशेष महत्व आहे. (Satara News)
कारवीचे प्रामुख्याने चार प्रकार आढळतात. दर सात वर्षांनी फुलणारी कारवी ‘व्हाईटी’ तर, ‘आकरा’ या प्रकारात दर चार वर्षांनी फुले येतात. ‘खरवर’ या प्रकारात दर सोळा वर्षांनी फुले येतात. प्रत्येक हंगामात येणार्‍या फुलोर्‍यावेळी मधमाशा त्या त्या फुलांमधून जो मध गोळा करतात तो विशेष उपयुक्त असल्याचे मानले जाते.
सध्या आकरा जातीच्या कारवी फुलांचा हंगाम सुरु झाला आहे. या कारवीची वैशिष्ठे म्हणजे हिची फुले साधारण अर्धा इंच लांब असतात, ती पांढर्‍या रंगाची असून फुलाची एक पाकळी थोडी लांब तर दुसरी तुलनात्मक आखूड असते. फुलांच्या आत परागकण असतात. तेथेच मध साठलेला असतो. या फुलांचा मादक व मोहक वास मधमाशांना आकर्षून घेतो. टोकदार हिरव्या पानांच्या झुपक्यामुळे या वनस्पतीला संरक्षण मिळते. त्यामुळे फुलोर्‍याच्या काळात मधमाशांव्यतिरिक्त कोणीही या वनस्पतीजवळ जात नाही.
या वनस्पतीचा फुलोरा साधारण मार्चपर्यंत कमी अधिक प्रमाणात असतो, अशी माहिती महाबळेश्वर येथील मध संचालनालयाचे सेवानिवृत्त संचालक वसंतराव पाटील यांनी दिली. गवतासारखी ही वनस्पती रस्त्याकडेला वा जंगलात जमिनीलगत वाढलेली असते. वेल प्रकारात ही वनस्पती मोडते. सध्या महाबळेश्वरच्या पठारावर आकराची फुले मोठ्या प्रमाणावर फुलल्याने हे पठार या फुलांमुळे अत्यंत आकर्षक दिसत आहे.
हेही वाचा :

नागपूर : शौचालयाच्या खिडकीतून महिलांचे व्हिडिओ काढणारा कला शिक्षक पोलिसांच्या ताब्यात
बीड येथे परप्रांतीय महिलेच्या माध्यमातून चालणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा
Nashik Accident : लासलगाव विंचूर रस्त्यावर दुचाकीस्वार जागीच ठार

Latest Marathi News महाबळेश्वरात चार वर्षांनी फुलली आकरा जातीची कारवीची फुले Brought to You By : Bharat Live News Media.