वाढीव वीजबिलांमुळे त्रस्त ग्राहकांना मिळणार प्रीपेड वीज!

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : डीश टीव्ही, मोबाईल रिचार्ज प्रमाणेच आता महावितरणकडूनही प्रीपेड वीज मिळणार आहे. यात वीज ग्राहकांना नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत मिळणार आहे. या मीटरचा खर्च केंद्र सरकारच्या अनुदातून महावितरणतर्फे केला जाणार आहे. यात मोबाईल व डिश रिचार्जप्रमाणे जेवढ्या रकमेचा रिचार्ज तेवढ्या दिवसांची वीज ग्राहकांना मिळणार आहे. रिजार्च संपताच मोबाईल प्रमाणेच महावितरणकडून ही … The post वाढीव वीजबिलांमुळे त्रस्त ग्राहकांना मिळणार प्रीपेड वीज! appeared first on पुढारी.

वाढीव वीजबिलांमुळे त्रस्त ग्राहकांना मिळणार प्रीपेड वीज!

रत्नागिरी; Bharat Live News Media वृत्तसेवा : डीश टीव्ही, मोबाईल रिचार्ज प्रमाणेच आता महावितरणकडूनही प्रीपेड वीज मिळणार आहे. यात वीज ग्राहकांना नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत मिळणार आहे. या मीटरचा खर्च केंद्र सरकारच्या अनुदातून महावितरणतर्फे केला जाणार आहे. यात मोबाईल व डिश रिचार्जप्रमाणे जेवढ्या रकमेचा रिचार्ज तेवढ्या दिवसांची वीज ग्राहकांना मिळणार आहे.
रिजार्च संपताच मोबाईल प्रमाणेच महावितरणकडून ही सेवा खंडित करण्यात येणार आहे. महावितरणच्या या स्मार्ट योजनेमुळे वाढीव वीज बिलांमूळे त्रस्त ग्राहकांसाठी तसेच मासिक खर्चाचे काटेकोर नियोजन करणार्‍यांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
सध्या जिल्ह्यात घरगुती, कृषी, वाणिज्य या विज ग्राहकांची संख्या 5 लाख 4 हजार 318 आहे. यातील कृषी ग्राहक वगळून अन्य प्रकारच्या वीज ग्राहकांच्या घरात महावितरणकडून हा स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे.
इतर प्रीपेड रिचार्जप्रमाणे वीज ग्राहक विजेचाही रिचार्ज करुन तिचा वापर करु शकणार आहेत. त्यामुळे एक महिन्यामध्ये किती वीज वापरावी, त्याचा खर्च याबाबत ग्राहकांना नियोजन करण्यास मदत होणार आहे. तसेच महावितरणकडून ग्राहकांना वेळोवेळी त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईलवर याबाबत संदेशही मिळणार आहे.
या रिचार्जमध्ये एखाद्या ग्राहकाचा विजेसाठीचा रिचार्ज मध्यरात्री संपला तरीही महावितरण कडून रात्रीचा वीज पुरवठा बंद करण्यात येणार नाही. त्यामुळे सायंकाळी 6 ते दुसर्‍या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत रिचार्ज संपला तरीही त्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही. मात्र, सकाळी 10 नंतरही रिचार्ज केला नाही तर मात्र महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून पुढील रिचार्ज केल्यावर आदल्या दिवशी सायंकाळी 6 ते सकाळी 10 वाजेपर्यंत वापरण्यात आलेल्या विजेचे पैसे त्यातून वजा करुन घेण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
Latest Marathi News वाढीव वीजबिलांमुळे त्रस्त ग्राहकांना मिळणार प्रीपेड वीज! Brought to You By : Bharat Live News Media.