अमरावती : जनगणनेच्या बहाण्याने नायब तहसीलदारांच्या घरी पाच लाखांची चोरी

अमरावती; Bharat Live News Media वृत्तसेवा : राठीनगर परिसरात जनगणनेसाठी आल्याचे सांगत दोन अज्ञातांनी तहसीलदारांच्या घरात चोरी केल्याचे उघडकीस आळे आहे. महिलेची पाच लाखांची लूट केल्याची माहिती आहे.
आज (दि. ३०) अकरा वाजताच्या दरम्यान शहरातील राठीनगर परिसरात नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या पत्नी जयश्री अडसुळे घरात एकट्याच असताना दोन तरुण तोंडाला रुमाल बांधून घरात शिरले. आम्ही जनगणनेच काम करायला आलो आहोत, आधार कार्ड दाखवा असे सांगून ते घरात आले होते. यानंतर संशयित दोघा आरोपी तरुणांनी चाकूचा धाक दाखवून पाच लाखांची लूटमार केल्याचे अडसुळे यांनी सांगितले. तिला चाकूचा धाक दाखवून घरात बांधून ठेवले व घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा पाच लाखाचा ऐवज या चोरट्यांनी दिवसाढवळ्या लुटून नेला.
याप्रकरणी अडसुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गाडगे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक देखील रवाना करण्यात आले आहे. अशी माहिती गाडगे नगरचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांनी दिली. घरात येताना हे आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहेत. मात्र तोंडाला रुमाल बांधला असल्याने पोलिसांसमोर या आरोपींना शोधून काढणे एक आव्हान आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून जनगणनेच्या नावावर सर्वे करायला कोणीही अशा प्रकारे आल्यास घरात आत घेऊ नये व बाहेरूनच माहिती द्यावी असे आवाहन गाडगे नगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गुल्हाने यांनी केले आहे.
Latest Marathi News अमरावती : जनगणनेच्या बहाण्याने नायब तहसीलदारांच्या घरी पाच लाखांची चोरी Brought to You By : Bharat Live News Media.
