राम मंदिराचे काम १५ फेब्रुवारीपासून पूर्ववत होणार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : २२ जानेवारी रोजी नव्या राम मंदिरात रामलल्लाची मुर्ती प्रतिष्ठापना पूर्ण झाल्यानंतर अयोध्येत भक्तांची वर्दळ वाढली आहे. मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाल्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसातच कोट्यवधींचे दान भक्तांकडून अर्पण करण्यात आले आहे. या भव्य अभिषेक सोहळ्यानंतर अयोध्येतील रामजन्मभूमी संकुलातील अपूर्ण काम आता पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. १५ फेब्रुवारीपासून हे काम सुरु करण्यात येणार आहे.
मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनामुळे मंदिरातील बांधकाम काहीकाळासाठी बंद करण्यात आले आहे. आता हे काम पूर्ण पूर्ववत होणार आहे. मंदिराच्या पश्चिमेला पुन्हा दोन टॉवर क्रेन उभारण्यात येत असून कामगारही १५ फेब्रुवारीला येथे पोहोचतील अशी माहिती आहे.
राम मंदिराचे विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा हे याबाबत बोलताना म्हणाले की, सध्या मालवाहू वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. काही दिवस बांधकामात गुंतलेली मशिन काढून टाकण्यात आली होती. आता ती पुन्हा स्थापित केले जाणार आहेत. एल अँड टीचे कामगारही आठवडाभरात परततील, त्यानंतरच कामाला वेग येईल असे मिश्रा म्हणाले.
हेही वाचा
Ram Mandir Pran Pratishtha : मुस्लिम धर्मगुरूविरोधात फतवा; राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेला होते उपस्थित
राम मंदिर हा केवळ पहिला टप्पा..!
Ram Mandir : अक्षयला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण मिळालं पण…; जॉर्डनमधील पोस्ट चर्चेत
Latest Marathi News राम मंदिराचे काम १५ फेब्रुवारीपासून पूर्ववत होणार Brought to You By : Bharat Live News Media.
