येरवड्यात छटपूजा उत्साहात ; उत्तर भारतीय महिलांसह भाविकांची गर्दी

येरवडा : पुढारी वृत्तसेवा :  येरवडा येथे मुळा नदीकाठावरील चिमा घाटावर रविवारी छटपूजेचे आयोजन केले होते. या ठिकाणी उत्तर भारतीय महिलांसह भाविकांची गर्दी झाली होती. सूर्यास्तावेळी नदीच्या पाण्यात उभे राहून या वेळी भाविकांनी अर्घ्य दिले. येरवडा येथील मानस मंडळाच्या वतीने या ठिकाणी छटपूजेचे आयोजन केले होते. या वेळी गंगा आरती भक्तिमय वातावरणात पार पडली. या … The post येरवड्यात छटपूजा उत्साहात ; उत्तर भारतीय महिलांसह भाविकांची गर्दी appeared first on पुढारी.

येरवड्यात छटपूजा उत्साहात ; उत्तर भारतीय महिलांसह भाविकांची गर्दी

येरवडा : पुढारी वृत्तसेवा :  येरवडा येथे मुळा नदीकाठावरील चिमा घाटावर रविवारी छटपूजेचे आयोजन केले होते. या ठिकाणी उत्तर भारतीय महिलांसह भाविकांची गर्दी झाली होती. सूर्यास्तावेळी नदीच्या पाण्यात उभे राहून या वेळी भाविकांनी अर्घ्य दिले. येरवडा येथील मानस मंडळाच्या वतीने या ठिकाणी छटपूजेचे आयोजन केले होते. या वेळी गंगा आरती भक्तिमय वातावरणात पार पडली. या महोत्सवाची सांगता सोमवारी (दि. 20) सकाळी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य देऊन होणार आहे. सूर्यषष्टी महाव्रत महापूजा, छोटकी छट आदींसह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. तसेच सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचेही या वेळी आयोजन केले होते. सूर्याची उपासना करण्यासाठी छटपूजेचे व्रत केले जाते.
सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याची प्राचीन काळापासूनची सामाजिक धारणा आहे. निसर्गात आणि समाजात एकरूपता साधणार्‍या या व्रतात, आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरणाप्रती समर्पणाची भावना असल्याचे उपस्थित भाविकांनी सांगितले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष रवी पांडे, उपाध्यक्ष नंदलाल विश्वकर्मा, दिनेश पांडे, शिवा तिवारी, सुरज दुबे आदींसह उत्तर भारतीय भाविक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :

पुणे शहरात 40 टक्के फुटपाथवर अतिक्रमणे
Crime news : मंगळवार पेठेत तरुणाचा खून

The post येरवड्यात छटपूजा उत्साहात ; उत्तर भारतीय महिलांसह भाविकांची गर्दी appeared first on पुढारी.

येरवडा : पुढारी वृत्तसेवा :  येरवडा येथे मुळा नदीकाठावरील चिमा घाटावर रविवारी छटपूजेचे आयोजन केले होते. या ठिकाणी उत्तर भारतीय महिलांसह भाविकांची गर्दी झाली होती. सूर्यास्तावेळी नदीच्या पाण्यात उभे राहून या वेळी भाविकांनी अर्घ्य दिले. येरवडा येथील मानस मंडळाच्या वतीने या ठिकाणी छटपूजेचे आयोजन केले होते. या वेळी गंगा आरती भक्तिमय वातावरणात पार पडली. या …

The post येरवड्यात छटपूजा उत्साहात ; उत्तर भारतीय महिलांसह भाविकांची गर्दी appeared first on पुढारी.

Go to Source