परभणी : पूर्णा तालुक्यात मोडी लिपीतील केवळ ८३ कुणबी नोंदी

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: तालूक्यातील एकूण ९४ गावापैकी ११ गावातील नागरिकांच्या सन १८८४ च्या रेकार्डनुसार नमुना ३३ वर घर रेकार्डवर मोडी लिपीतील एकूण ८३ कुणबी जातीच्या नोंदी शिंदे समितीच्या टीमने शोधून काढल्या आहेत. तशी नोंद तहसिल कार्यालयातील संकीर्ण विभागात दाखल करण्यात आली आहे. Parbhani यात मोडी लिपीतील नमुना नंबर ३३ वर आहेरवाडी, खांबेगाव, मुंबर, एकरुखा, दस्तापूर, … The post परभणी : पूर्णा तालुक्यात मोडी लिपीतील केवळ ८३ कुणबी नोंदी appeared first on पुढारी.

परभणी : पूर्णा तालुक्यात मोडी लिपीतील केवळ ८३ कुणबी नोंदी

पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा: तालूक्यातील एकूण ९४ गावापैकी ११ गावातील नागरिकांच्या सन १८८४ च्या रेकार्डनुसार नमुना ३३ वर घर रेकार्डवर मोडी लिपीतील एकूण ८३ कुणबी जातीच्या नोंदी शिंदे समितीच्या टीमने शोधून काढल्या आहेत. तशी नोंद तहसिल कार्यालयातील संकीर्ण विभागात दाखल करण्यात आली आहे. Parbhani
यात मोडी लिपीतील नमुना नंबर ३३ वर आहेरवाडी, खांबेगाव, मुंबर, एकरुखा, दस्तापूर, भाटेगाव, धोत्रा, गणपूर, गोविंदपूर, कात्नेश्वर, माहेर गावातील मराठा नागरिकांचा जात कुणबी म्हणून नोंदीचा समावेश असून उर्वरित ८३ गावात कुणबी नोंद सापडली नसल्याचे तहसिल प्रशासनाने सांगितले. तर यानंतर परत शिंदे समितीची टीम येऊन नोंदीची सखोल तपासणी करण्याची गरज आहे. आता महाराष्ट्र सरकारने कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या नातेईवाईकांसाठी सगेसोयरे चा अध्यादेश काढल्यामुळे‌ फायदा होणार नाही. परंतु अनेक गावात अद्याप कुणबी नोंदी सापडल्या नसल्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. Parbhani
मराठा समाजाला सरसकट ओबीसीत कुणबी म्हणून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील व राज्यातील सकल मराठा समाजाने साखळी तसेच अमरण उपोषणे, रास्ता रोको सह विविध मार्गांनी तब्बल साडेचार महिन्यांपासून आंदोलने केली. अखेर राज्य सरकारने कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती स्थापन केली. या समितीने शासकीय दवाखाना, शाळा, पंचायत समिती, पोलीस ठाणे, भूमी अभिलेख, रजिस्ट्री कार्यालय येथे कुणबी नोंद तपासण्याचे काम हाती घेतले. यात ज्यात ५४ लाख नोंदी सापडल्या. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत.
हेही वाचा 

परभणी: खोटे जात वैधता प्रमाणपत्र: जिंतूरमध्ये गोर सेनेचा रास्ता रोको
परभणी: जिंतूर तहसिल कार्यालयापुढे तहसीलदारांच्या गाडीला आग
परभणी : शेतरस्ता खुला द्यावा, या मागणीसाठी शेतक-यांचे उपोषण

Latest Marathi News परभणी : पूर्णा तालुक्यात मोडी लिपीतील केवळ ८३ कुणबी नोंदी Brought to You By : Bharat Live News Media.