लासलगाव विंचूर रस्त्यावर दुचाकीस्वार जागीच ठार

लासलगाव(वार्ताहर)- लासलगाव -विंचूर रस्त्यावरील मंजुळा पॅलेस जवळ मोटारसायकलस्वारास मालवाहतूक ट्रक ने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धारणगाव खडक येथील राहुल सुधाकर कानमहाले वय ३१ हा युवक टी व्हीं एस … The post लासलगाव विंचूर रस्त्यावर दुचाकीस्वार जागीच ठार appeared first on पुढारी.

लासलगाव विंचूर रस्त्यावर दुचाकीस्वार जागीच ठार

लासलगाव(वार्ताहर)- लासलगाव -विंचूर रस्त्यावरील मंजुळा पॅलेस जवळ मोटारसायकलस्वारास मालवाहतूक ट्रक ने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धारणगाव खडक येथील राहुल सुधाकर कानमहाले वय ३१ हा युवक टी व्हीं एस कंपनीच्या मोटारसायकल क्रमांक (एम एच १५ एफ डब्लू ४७६१) ने लासलगाव कडून विंचूर च्या दिशेने जात असताना मंजुळा पॅलेस जवळ सोमवारी रात्री दहा वाचेच्या दरम्यान या मोटारसायकलच्या पाठीमागून येत असलेल्या मालवाहतूक ट्रक क्रमांक (एम एच १८ ए डी ५७६०) या ट्रक ने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने या धडकेत मोटारसायकलस्वार राहुल सुधाकर कानमहाले हा युवक जागीच ठार झाला. या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स पो नि भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो ह रामदास घुमरे करत आहे.
लासलगाव-विंचूर रस्ता मृत्यूचा सापळा
लासलगाव-विंचूर हा रस्ता जणू मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेक लोकांचा बळी गेला आहे. येथील नागरिकांकडून लासलगाव विंचूर रस्त्यावर चौपदरीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षतेमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून याचा फटका या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना सोसावा लागत आहे. मोठ्या वाहनांची वर्दळ या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात होत असते यामुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.
हेही वाचा :

Divya Deshmukh : ‘माझ्या खेळापेक्षा; मला बाई म्हणून पाहिले’, मराठमोळ्या बुद्धीबळपटू दिव्या देशमुखची खंत
नाशिकची सायली वाणी टेबल टेनिस राष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी मुकुटाने सन्मानित 

Latest Marathi News लासलगाव विंचूर रस्त्यावर दुचाकीस्वार जागीच ठार Brought to You By : Bharat Live News Media.