‘EVM’ च्या पोटात दडलंय काय? NCP चा सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क: येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून EVM मशीनवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने देखील ईव्हीएम मशीनबाबत ‘EVM च्या पोटात नेमकं दडलंय काय?’ असा सवाल उपस्थित केला आहे. या संदर्भातील एक्स पोस्ट नॅशनल काँग्रेस पार्टी शरद पवार गटाने केली … The post ‘EVM’ च्या पोटात दडलंय काय? NCP चा सवाल appeared first on पुढारी.
‘EVM’ च्या पोटात दडलंय काय? NCP चा सवाल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून EVM मशीनवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने देखील ईव्हीएम मशीनबाबत ‘EVM च्या पोटात नेमकं दडलंय काय?’ असा सवाल उपस्थित केला आहे. या संदर्भातील एक्स पोस्ट नॅशनल काँग्रेस पार्टी शरद पवार गटाने केली आहे. यापूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला यांनी देखील ‘इव्हीएम’ वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. (EVM Machine News)
ईव्हीएम मशीन बनवणारी कंपनी अन् सत्ताधारी यांचे संबंध
एनसीपीने पुढे म्हटले आहे की, “ईव्हीएम मशीनच्या बाबत देशभरात अनेक ठिकाणी संशय व्यक्त केला जात असताना, काल भारत सरकारचे माजी सचिव सरमा यांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल), जी कंपनी ईव्हीएम मशीन बनवते. त्या कंपनीत सत्ताधारी पक्षाशी संबंधित व्यक्ती संचालक पदावर असल्याचे निदर्शनास आणून दिल्याचे देखील ट्विटमध्ये म्हटले आहे. (EVM Machine News)
ईव्हीएम चीपमध्ये फेरबदल करणे शक्य
ईव्हीएमच्या माध्यमाने सत्ताधारी पक्ष बीईएल, सीपीएसईच्या कामकाजावर देखरेख ठेवत आहे. तसेच ईव्हीएम मशीन उत्पादन आणि पुरवठा प्रक्रियेत सामील असल्याचे सूचित देखील माजी सचिवांनी स्पष्ट केले आहे. दोन वर्षांपूर्वीच ईव्हीएम चीपमध्ये फेरबदल करता येत असून, त्यात नवीन डेटा प्रोग्राम केला जाऊ शकतो ही बाब समोर आलेली असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका माजी सचिवाची ही शक्यता अनेकांच्या मनात संशय निर्माण करत आहे. (EVM Machine News)

ईव्हीएम मशीनच्या बाबत देशभरात अनेक ठिकाणी संशय व्यक्त केला जात असताना, काल भारत सरकारचे माजी सचिव सरमा यांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल), जी कंपनी ईव्हीएम मशीन बनवते, त्या कंपनीत सत्ताधारी पक्षाशी संबंधित व्यक्ती संचालक पदावर असल्याचे निदर्शनास आणून दिले.
या माध्यमाने सत्ताधारी… pic.twitter.com/fYANDNFrtP
— NCP (@NCPspeaks) January 30, 2024

हेही वाचा:

नितीश कुमारांच्‍या ‘यू-टर्न’चे राहुल गांधींनी सांगितले कारण; म्‍हणाले….
Pushkar Jog : BMC कर्मचाऱ्यांशी वादानंतर पुष्कर जोगचा माफीनामा, नेमकं काय घडलं?
Hemant Soren’s ‘Plan-B’: हेमंत सोरेन यांचा ‘प्लॅन-B’ तयार, ‘या’ होणार झारखंडच्‍या नव्या मुख्यमंत्री?

 
Latest Marathi News ‘EVM’ च्या पोटात दडलंय काय? NCP चा सवाल Brought to You By : Bharat Live News Media.