जरांगे पाटील यांचा पुन्हा एल्गार; १० फेब्रुवारीला करणार उपोषणाला सुरुवात
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत उपोषण करण्यासाठी रवाना झाल्यानंतर सरकारने सर्व मागण्या करत अध्यादेश काढणार असल्याचे आश्वासन दिले. या अश्वासनानंतर मराठा आंदोलकांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मात्र या घोषणेनंतर जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत मी एवढ्यावर थांबणाऱ्यातला नाही. सरकारने दिलेले अश्वासन पूर्ण करण्यासाठी पुन्हा उपोषण करणार असल्याची माहिती दिली. रायगड येथे पत्रकार परिषद पार पडली.
जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने दिलेला शब्द पाळावा अशी आमची भुमिका आहे. सगेसोयरेंना देखील आरक्षणात घेण्याची आमची मागणी आहे. कायद्यावर आमचा विश्वास आहे. पण याबाबत सरकारने लवकरात लवकर लवकर अंमलबजावणी सुरु करवी. तसेच आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी १० फेब्रुवारी पासून पुन्हा उपोषण सुरु करणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली.
हेही वाचा
Maratha Reservation I मराठा विजयोत्सवात जरांगे-पाटलांचा शब्द प्रमाण मानण्याचा ठराव
Latest Marathi News जरांगे पाटील यांचा पुन्हा एल्गार; १० फेब्रुवारीला करणार उपोषणाला सुरुवात Brought to You By : Bharat Live News Media.