Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपा संदर्भात आज महाविकास आघाडीची बैठक मुंबईत बोलाविण्यात आली होती. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर गेले होते. दरम्यान, त्यांना १ तास बैठकीबाहेर बसवून ठेवण्यात आले. यावर पुंडकर यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. VBA On MVA
महाविकास आघाडीची मुंबईतील ट्रायडेंड हॉटेलमध्ये आज बैठक होती. यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते. त्यावेळी डॉ. पुंडकर यांनी बैठकीत आपला अजेंडा महाविकास आघाडीसमोर सादर केला. तेव्हा आम्ही चर्चा करून सांगतो, असे म्हणून त्यांना १ तास बैठकीबाहेर बसवून ठेवण्यात आले आणि आतमध्ये आघाडीतील तीन पक्षांची बैठक सुरू होती. आजच्या बैठकीत मिळालेल्या वागणुकीबाबत डॉ. पुंडकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. VBA On MVA
हेही वाचा
काँग्रेसच्या ताठरपणामुळे इंडिया आघाडीचे भवितव्य संपले : प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांची एकनाथ शिंदे यांना ऑफर, म्हणाले…
‘मविआ’त प्रकाश आंबेडकर येणार
Latest Marathi News ‘मविआ’च्या बैठकीबाहेर ‘वंचित’चे डॉ. धैर्यवर्धन पुंडकर तिष्ठत Brought to You By : Bharat Live News Media.