काटकसरी असल्याने पतीस सर्पदंश देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा– खर्चासाठी पैसे देत नसल्याच्या किरकोळ कारणातून पत्नीने पतीचा खुन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना म्हसरुळ येथील बोरगड परिसरात घडली. धक्कादायक म्हणजे पत्नीने इतर दोन संशयितांच्या मदतीने पतीवर प्राणघातक हल्ला केला व सर्पदंश करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पतीने संशयितांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत घराबाहेर पडून मित्राच्या मदतीने जिल्हा रुग्णालय गाठले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर म्हसरुळ पोलिस ठाण्यात पत्नीसह इतर दोघांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पोपटराव पाटील (४१, रा. उज्वलनगर) यांच्यावर त्यांची पत्नी सोनी उर्फ एकता राजेंद्र जगताप हिच्यासह इतर दोन अनोळखी व्यक्तींनी शनिवारी (दि.२७) रात्री हल्ला केला. विशाल यांच्या फिर्यादीनुसार, एकताने विशाल यांना बिअर पाजली. त्यानंतर जेवन देण्याच्या बहाण्याने तिने घराच्या मागील दरवाजातून संशयितांना घरात घेतले. त्यांनी विशालवर प्राणघातक हल्ला केला. विशालने प्रतिकार केल्यानंतर एकतानेही उशीने विशाल यांचे तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, एका संशयिताने बॅगेतून साप काढून विशाल यांच्या मानेजवळ नेल्याने सापाने त्यांना चावा घेतला. त्यानंतर संशयितांच्या तावडीतून विशालने स्वत:ची सुटका करून घेत घराबाहेर पळ काढला. त्यानंतर मित्रांच्या मदतीने विशाल जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले. वेळीच उपचार मिळाल्याने विशाल यांचा जीव वाचला. दरम्यान, म्हसरुळचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या पथकाने विशाल यांच्याकडे चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
Crime News : वकील दाम्पत्याच्या खुनातील ‘तो’ आरोपीही जाळ्यात
Hemant Soren’s ‘Plan-B’: हेमंत सोरेन यांचा ‘प्लॅन-B’ तयार, ‘या’ होणार झारखंडच्या नव्या मुख्यमंत्री?
Nashik Crime New : नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांकडून ज्येष्ठ नागरिकास 5 लाखांना गंडा
Latest Marathi News काटकसरी असल्याने पतीस सर्पदंश देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न Brought to You By : Bharat Live News Media.