गोवा : माशेल येथील मारहाणप्रकरणी २ पोलिसांसह ६ जणांना अटक

पणजी: पुढारी वृत्तसेवा : माशेल येथे ‘फास्ट फूड’ चालक विराज माशेलकर याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी दोन पोलिसांसह सहाजणांना अटक करण्यात आली आहे. फोंडा पोलिस स्थानकाचा हवालदार समीर फडते ( वय 46, रा. बेतकी) याने व्यावसायिक भागीदार असलेल्या विराज माशेलकर याच्यावर हल्ला केला होता. Goa News याप्रकरणी समीर फडते याच्यासह राखीव पोलिस दल कॉन्स्टेबल मितेश गाड (27, … The post गोवा : माशेल येथील मारहाणप्रकरणी २ पोलिसांसह ६ जणांना अटक appeared first on पुढारी.

गोवा : माशेल येथील मारहाणप्रकरणी २ पोलिसांसह ६ जणांना अटक

पणजी: Bharat Live News Media वृत्तसेवा : माशेल येथे ‘फास्ट फूड’ चालक विराज माशेलकर याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी दोन पोलिसांसह सहाजणांना अटक करण्यात आली आहे. फोंडा पोलिस स्थानकाचा हवालदार समीर फडते ( वय 46, रा. बेतकी) याने व्यावसायिक भागीदार असलेल्या विराज माशेलकर याच्यावर हल्ला केला होता. Goa News
याप्रकरणी समीर फडते याच्यासह राखीव पोलिस दल कॉन्स्टेबल मितेश गाड (27, नावेली), मोहित गाड (26, नावेली), सुप्रेश सावर्डेकर (31, हरवळे), विवेक देसाई (23, साखळी) व अस्मित साळुंखे (27, आमोणा) यांच्यावर म्हार्दोळ पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. त्यांना मंगळवारी (दि. 30) अटक केली आहे. आरबीआयचा पोलिस कॉन्स्टेबल आकाश नावेलकर (27, नावेली) याला नोटीस पाठवली आहे. Goa News
याप्रकरणी हवालदार समीर फडते, अमलीपदार्थ विरोधी पथकाचा कर्मचारी आकाश नावेलकर व भारतीय राखीव पोलिस दलाचा कर्मचारी मितेश गाड यांना सोमवारी रात्री सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक बॉसुएट सिल्वा यांनी ही कारवाई केली. यापूर्वी मार्च 2022 मध्ये जुने गोवे पोलिस स्थानकात हाणामारी केल्याप्रकरणी समीर फडते याला निलंबित करण्यात आले होते.
माशेल मारहाणप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी एकूण 8 जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. उपरोल्लिखित 3 पोलिस कर्मचार्‍यांबरोबर मोहित गाड (टॅक्सी चालक), सुप्रेश व अन्य 3 जणांचा समावेश आहे. मुख्य संशयित समीर फडते याने यापूर्वी 6 वेळा विराज याच्याशी भांडण केले होते.
विराज माशेलकर व समीर फडते यांच्या पत्नीने भागीदारीमध्ये माशेल येथे फास्ट फूडचे दुकान घातले होते. कोविडच्या काळात व्यावसाय होत नसल्याने माशेलकर याने समीरच्या पत्नीला बाजूला ठेऊन स्वतः व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. कोरोना काळ संपल्यानंतर समीरने पुन्हा आपल्या बायकोला व्यवसायात सहभागी करून घेण्याची सूचना विराजला केली. मात्र, विराजने ती ऐकली नाही. त्यामुळे दोघांत अनेकवेळा खटके उडाले.
यापूर्वी सहावेळा प्रकरण पोलिसांपर्यंत गेले होते. शेवटी रविवारी (दि.28) रात्री 11 वाजता समीर फडते याने इतर 4 साथीदारांबरोबर दुकानात घुसून विराज याला मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या विराज यांना त्वरित गोमेकॉत दाखल करण्यात आले. त्याला दुसर्‍या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला.
हेही वाचा 

गोवा : राज्यातील ८ हजार मतदार लोकसभेसाठी पोस्टाने मतदान करणार
गोवा: सलग सुट्ट्यांमुळे गोवा पर्यटकांनी गजबजला; अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी
गोवा: श्री देव बोडगेश्वरांचे अर्जुन तेंडुलकरने घेतले दर्शन

Latest Marathi News गोवा : माशेल येथील मारहाणप्रकरणी २ पोलिसांसह ६ जणांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.