ढाकणेंचा सल्ला अन् लंकेंचे सूचक वक्तव्य !

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले आमदार नीलेश लंके यांना राष्ट्रवादी शरद पवार गटात येण्याचा सल्ला अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी दिला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यावरून घुमजाव केल्यानंतरही, आमदार लंके यांनी ढाकणे यांना ‘तुमचे काही सल्ले मी ऐकतो बरं का’, असे म्हणत सूचक वक्तव्य केले. त्यामुळे लंके यांची आगामी … The post ढाकणेंचा सल्ला अन् लंकेंचे सूचक वक्तव्य ! appeared first on पुढारी.

ढाकणेंचा सल्ला अन् लंकेंचे सूचक वक्तव्य !

पाथर्डी तालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा :  राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले आमदार नीलेश लंके यांना राष्ट्रवादी शरद पवार गटात येण्याचा सल्ला अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी दिला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यावरून घुमजाव केल्यानंतरही, आमदार लंके यांनी ढाकणे यांना ‘तुमचे काही सल्ले मी ऐकतो बरं का’, असे म्हणत सूचक वक्तव्य केले. त्यामुळे लंके यांची आगामी वाटचाल काय असणार, याबाबत पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत. पाथर्डीत आयोजित एका कार्यक्रमात अ‍ॅड. ढाकणे यांनी आमदार लंके यांना राष्ट्रवादी शरद पवार गटात येण्याचा सल्ला दिला.
अ‍ॅड. ढाकणे म्हणाले, आमदार लंके यांनी खासदार व्हावे, ही आमच्या सर्वांची इच्छा आहे. मी शरद पवार यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे थोडा स्वार्थ ठेवून सांगतो की, लंके यांनी रस्ता थोडा बदलावा व मोठ्या दारात यावे. मोठे मोठेच असतात अन् छोटे छोटेच असतात. वडिलकीच्या नात्याने आग्रह करतो की, लंके यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात येऊन लोकसभा लढवावी. आमदार लंके यांनी आपल्या कार्याचा ठसा राज्यभर उमटविला आहे. तरुणांना आकर्षित करण्याची ताकद त्यांच्यात आहे. कुणीही अन् कधीही बोलवा, ते प्रत्येकाला वेळ देतात. हात दाखवा अन गाडी थांबवा, असा हा कार्यकर्ता आहे. असा सर्वसामान्याशी नाळ जोडलेला लोकप्रतिनिधी दिल्लीत गेला पाहिजे, ही लोकभावना आहे.
त्यावर आमदार लंके म्हणाले, स्व. बबनराव ढाकणे यांच्या संघर्षमय नेतृत्वाचा अभ्यास करून, मी जमिनीवर राहून वाटचाल करत आहे. तुम्हीही जमिनीवर राहून काम करतात, याचा मला अभिमान आहे. काका, तुम्ही माझे आदर्श आहात. तुमचे अनेक सल्ले मी ऐकतो बरं का, असे म्हणत आगामी वाटचालीचे संकेत दिले. लंके यांच्या वक्तव्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवित आताच घोषणा करा, असा आग्रह केला. त्यावर ढाकणे यांनी उपस्थितांना असा आग्रह करू नका, असे म्हणत शांत केले. मात्र, ढाकणे यांच्या आवाहनाला आमदार लंके यांनी दिलेल्या संकेताची राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
Latest Marathi News ढाकणेंचा सल्ला अन् लंकेंचे सूचक वक्तव्य ! Brought to You By : Bharat Live News Media.