BMC कर्मचाऱ्यांशी वादानंतर पुष्कर जोगचा माफीनामा, नेमकं काय घडलं?
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राज्यभरात मराठा जातीय सर्वेक्षणाचे काम सुरु असताना बीएमसी कर्मचारी आणि अभिनेता पुष्कर जोग यांच्यात वाद झाला होता. (Pushkar Jog) ज्यावेळी महानगरपालिकेचे कर्मचारी सर्वेक्षणासाठी त्याच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांने संताप व्यक्त केला. कारण, कर्मचाऱ्यांनी जात विचाराने त्याला राग आला होता. ज्यामुळे पुष्करची चर्चादेखील झाली. आता त्याने दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे. (Pushkar Jog )
संबंधित बातम्या –
’12th Fail’ ची अभिनेत्री मेधा शंकर रिअल लाईफमध्ये इतकी ग्लॅमरस
हृतिक रोशनने War 2 बदद्ल दिली मोठी अपडेट; ज्यु. एनटीआरची होणार एन्ट्री?
Fighter Box Office: ऋतिक-दीपिकाचा ‘फायटर’ १०० कोटींच्या क्लबमध्ये
पुष्करने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला होता. पण, बीएमसीने त्याच्या या पोस्टवर विरोध करत त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. पण, पुष्करने पुन्हा पोस्ट लिहित कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त केली.
पुष्करने पोस्ट करून व्यक्त केली दिलगिरी
‘मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणूसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा दिलगिरी.’
Latest Marathi News BMC कर्मचाऱ्यांशी वादानंतर पुष्कर जोगचा माफीनामा, नेमकं काय घडलं? Brought to You By : Bharat Live News Media.