भोगावती मतमोजणी पेपरवरील खाडाखोडीवरुन वाद
राशिवडे ; पुढारी वृतसेवा टेबलला संस्थांचे सचिव मतमोजणीसाठी असतील तर ही यंत्रणा मॅनेज केली आहे. असा आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी केला. तर शिवसेनेचे निवास पाटील यांनी सबंध प्रक्रियेवरती आक्षेप घेत सर्व टेबलवरचे सेवा संस्थेचे सचिव बदला आणि सरकारी कर्मचारी नेमा असा मुद्दा मांडला. यामुळे अर्धा तास वातावरण तणावग्रस्त झाले होते.
सत्ताधारी लोकांनी एवढा मोठा कर्जाचा बोजा करूनही जर अशा पद्धतीची मतमोजणीची यंत्रणा वापरण्यात येणार असेल, तर हा कारखाना जो शेतकऱ्यांच्या घामातून उभारला आहे तो पूर्ण उध्वस्त होईल. असा आरोपही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळेला व्यक्त केला. पोलीस यंत्रणा आणि निवडणूक यंत्रणेला याबाबत जाब विचारून झालेली मतमोजणी फेर करावी अशी मागणी ही करण्यात आली. यामध्ये भाजपचे सुभाष जाधव, दत्तात्रय मेडशिंगे, निवास पाटील, जनार्दन पाटील अधिकारी यांचा समावेश होता.
हेही वाचा :
The post भोगावती मतमोजणी पेपरवरील खाडाखोडीवरुन वाद appeared first on पुढारी.
राशिवडे ; पुढारी वृतसेवा टेबलला संस्थांचे सचिव मतमोजणीसाठी असतील तर ही यंत्रणा मॅनेज केली आहे. असा आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी केला. तर शिवसेनेचे निवास पाटील यांनी सबंध प्रक्रियेवरती आक्षेप घेत सर्व टेबलवरचे सेवा संस्थेचे सचिव बदला आणि सरकारी कर्मचारी नेमा असा मुद्दा मांडला. यामुळे अर्धा तास वातावरण तणावग्रस्त झाले होते. सत्ताधारी लोकांनी …
The post भोगावती मतमोजणी पेपरवरील खाडाखोडीवरुन वाद appeared first on पुढारी.