मतांसाठीच ओबीसी नेत्यांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही : भुजबळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा समाज मते देणार नाही, म्हणून त्यांना आरक्षण दिले जात आहे. मराठा आरक्षणासाठी चुकीचे दाखले काढण्यात आले आहेत, निवडणुकीतील मतांसाठीच ओबीसी नेते मराठा आरक्षणाला विरोध करत नाही, असा दावा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज (दि.३०) पुढारी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. Chhagan Bhujbal On Maratha reservation ते पुढे … The post मतांसाठीच ओबीसी नेत्यांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही : भुजबळ appeared first on पुढारी.

मतांसाठीच ओबीसी नेत्यांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही : भुजबळ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मराठा समाज मते देणार नाही, म्हणून त्यांना आरक्षण दिले जात आहे. मराठा आरक्षणासाठी चुकीचे दाखले काढण्यात आले आहेत, निवडणुकीतील मतांसाठीच ओबीसी नेते मराठा आरक्षणाला विरोध करत नाही, असा दावा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज (दि.३०) Bharat Live News Media वृत्तवाहिनीशी बोलताना केला. Chhagan Bhujbal On Maratha reservation
ते पुढे म्हणाले की, सर्व मराठा समाजाला ओबीसीमद्ये आणण्याचे कारण काय ? मराठा समाजाला आरक्षण देऊन काय फायदा झाला आहे. मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण का दिले जात आहे, जुनी कागदपत्रे काढून त्यांच्या हाताने त्यात लिहिण्यात येत आहे, असा दावाही भुजबळ यांनी केला. Chhagan Bhujbal On Maratha reservation
आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यात यावे. त्यांना ओबीसींमधून आरक्षण देण्यास आमचा आधीपासून विरोध आहे. जात जन्माने येते, शपथपत्राने नाही, असे सांगून सर्व मराठा समाजाला ओबीसींत आणण्याचे कारण काय ? असा सवाल करून ओबीसींची संख्या ५४ टक्के असून ओबीसींची मते महत्त्वाची वाटत नाहीत का ? असेही ते म्हणाले.
मग ब्राम्हण आणि ओबीसींना प्रमाणपत्राद्वारे आरक्षण द्यावे. सर्वांना मोफत शिक्षण द्या, आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही. असे सांगून संपूर्ण राज्यात मराठा समाजाची दहशत पसरली आहे. अनेक विचारवंत, लेखक घाबरून गप्प बसले आहेत, असा दावा करून ३५ वर्षे मी जातीसाठी लढत आहे. मी माझे काम सोडणार नाही, पुढे काय होईल ते होईल, यापुढेही ओबीसी समाजासाठी कार्यरत राहू, असे भुजबळ म्हणाले.
हेही वाचा 

Chhagan Bhujbal : ओबीसींसाठी लढतोय, लढत राहणार
Chhagan Bhujbal : ओबीसींना गाफील ठेवून मराठा आरक्षणाचा निर्णय, आम्ही गप्प बसणार नाही
Chhagan Bhujbal On Maratha Aarakshan : ‘हा’ अध्यादेश नाही, फक्त मसुदा; आम्ही हरकती घेणार

Latest Marathi News मतांसाठीच ओबीसी नेत्यांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही : भुजबळ Brought to You By : Bharat Live News Media.