मंचर येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  पंचवीस वर्षीय विवाहितेचा मंचर (ता. आंबेगाव) येथे संशयास्पद मृत्यू झाला असून, याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या विवाहितेला चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी शारीरिक,मानसिक त्रास देत तिचा वारंवार छळ करून तिच्या मृत्यूस सासरचे लोक कारणीभूत ठरल्याप्रकरणी फिर्याद मृत्यू पावलेली विवाहितेची आई स्वाती अतुल … The post मंचर येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू appeared first on पुढारी.

मंचर येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

मंचर : Bharat Live News Media वृत्तसेवा :  पंचवीस वर्षीय विवाहितेचा मंचर (ता. आंबेगाव) येथे संशयास्पद मृत्यू झाला असून, याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या विवाहितेला चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी शारीरिक,मानसिक त्रास देत तिचा वारंवार छळ करून तिच्या मृत्यूस सासरचे लोक कारणीभूत ठरल्याप्रकरणी फिर्याद मृत्यू पावलेली विवाहितेची आई स्वाती अतुल बांगर (रा. बेल्हे, ता. जुन्नर, सध्या रा.फाकटे ता. शिरूर) यांनी दिली आहे. अनुष्का केतन गावडे (वय 25) असे मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी अनुष्काचा पती केतन गुलाब गावडे, सासरा गुलाब सखाराम गावडे, सासू कल्पना, भावजय डॉ .कांचन गुलाब गावडे, जाऊ डॉ .शुभांगी कांचन गावडे (सर्व रा. मंचर, ता. आंबेगाव, मूळगाव बेलसरवाडी -निरगुडसर) यांच्यावर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि.26) मध्यरात्री स्वाती बांगर या फाकटे येथे घरी असताना त्यांचा पुतण्या हर्षल सुभाष बांगर हा घरी आला व अनुष्काची तब्येत बरी नाही. तिला उलट्या होत आहेत. आपल्याला तात्काळ मंचर येथे दवाखान्यात जायचे आहे, असे सांगितले. नंतर फिर्यादी स्वाती बांगर व त्यांचे पती अतुल, पुतण्या हर्षल यांनी उपजिल्हा रुग्णालय, मंचर येथे येऊन अनुष्काला पाहिले असता तिचे नाकातोंडातून रक्त व फेस आलेला होता. तिचे शरीर काळे-निळे पडलेले होते. या वेळी अनुष्काच्या आई-वडिलांनी त्यांच्या सासरच्या मंडळींना विचारले असता त्यांनी अनुष्का हिला आमच्या मंचर येथील गावडे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिला आम्ही उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, मंचर येथे आणले असता डॉक्टरांनी ती मयत झाल्याचे सांगितले आहे.
तेव्हा फिर्यांदीनी पती केतन गावडे याला तुम्ही दोघेजण बुधवारी( दि .24) आमच्याकडे आले होते.तेव्हा ती चांगली होती. तिला अचानक काय झाले,असे विचारले त्या वेळी केतन याने उडवाउडवीची उत्तरे दिली. 2022 मध्ये ही अनुष्का ही सुमारे अडीच महिन्याची गरोदर होती तेव्हा तिचा मंचर येथील गावडे हॉस्पिटलमध्ये गर्भपात केला आहे, असे अनुष्का हिने तिच्या आईला सांगितले होते. त्यामुळे मुलीच्या मृत्यूबाबत घातपात केला आहे,असा संशय मुलीच्या नातेवाइकांना असल्याने मुलीची आई स्वाती बांगर यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अनुष्का यांचा विवाह 1 एप्रिल 2021 रोजी केतन गुलाब गावडे (सध्या, रा. मंचर ता.आंबेगाव, मूळ रा. बेलसरवाडी,निरगुडसर ता. आंबेगाव) याच्याशी झाला होता. लग्नानंतर अनुष्का हिला सासरकडील लोकांनी तीन ते चार महिने व्यवस्थित वागविले,त्यानंतरअनुष्काचा पती केतन याने चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये, असे म्हणून तिला दमदाटी, मारहाण केली आणि सतत तो हा प्रकार करत होता.
Latest Marathi News मंचर येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.