सोलो ट्रॅव्हलिंगची तरुणाईत क्रेझ

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अनुपने काही वर्षांपासून भारतातील विविध ठिकाणांची भटकंती सुरू केली…तेथील खाद्यपदार्थापासून ते पेहरावापर्यंत… सर्वकाही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या भटकंतीचे काही व्हिडीओ आणि छायाचित्रे त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले अन् त्याला नेटिझन्सचा प्रतिसाद मिळाला. आता म्हणालं, त्याच्या भटकंतीमध्ये विशेष काय असेल… तर त्याने ही भटकंती केली आहे एकट्याने (सोलो ट्रॅव्हलिंग)… … The post सोलो ट्रॅव्हलिंगची तरुणाईत क्रेझ appeared first on पुढारी.

सोलो ट्रॅव्हलिंगची तरुणाईत क्रेझ

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा :  अनुपने काही वर्षांपासून भारतातील विविध ठिकाणांची भटकंती सुरू केली…तेथील खाद्यपदार्थापासून ते पेहरावापर्यंत… सर्वकाही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या भटकंतीचे काही व्हिडीओ आणि छायाचित्रे त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले अन् त्याला नेटिझन्सचा प्रतिसाद मिळाला. आता म्हणालं, त्याच्या भटकंतीमध्ये विशेष काय असेल… तर त्याने ही भटकंती केली आहे एकट्याने (सोलो ट्रॅव्हलिंग)… सध्या तरुणाईमध्ये एकट्याने भटकंती करण्याचा ट्रेंड वाढत असून, फक्त भारतातच नव्हे, तर जगातील विविध देशांमध्ये तरुण-तरुणी सोलो ट्रॅव्हलिंग करत आहेत.
देश- विदेशांत करताहेत भटकंती
सध्याच्या घडीला अनुप याच्याप्रमाणे अनेक तरुण एकट्याने जगभ्रमंती करत आहेत. अशा पद्धतीने भ्रमंती करणार्‍या तरुणांची संख्या वाढत आहे. पूर्वीपासून कुटुंबासमवेत, जोडीदारासमवेत किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर विविध ठिकाणी भटकंती करण्याची रीत चालत आली आहे. पण, आता ही रीत बदलली असून, एकट्याने फिरणार्‍या तरुणांची संख्या वाढत आहे. एकट्याने प्रवास करून तरुण विविध ठिकाणे फिरत आहेत. येथील भाषा, खाद्यपदार्थ, माणसं, पेहराव, जीवनशैली यासह निसर्ग जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. एकट्याने फिरणार्‍या या तरुणांचा भटकंतीचा प्रवास व्हिडिओ स्वरूपात यू-ट्यूब चॅनेल, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आहेत. आपल्या नजरेतून जग दाखविण्याचा ते प्रयत्न करत आहेत. याविषयी प्रणव तावरे म्हणाला, मी वेळ मिळाला की, एकट्याने भटकंतीला जातो. आपल्या प्रवासासाठी मी एक बजेट ठरवतो, त्याप्रमाणे खर्च करून प्रवास करतो. नियोजित ठिकाणी जाण्यापूर्वी येथील संपूर्ण माहिती घेऊन नियोजन करतो. भारतातील केरळ, गोवा, कोकण अशा ठिकाणी भटकंती केली आहे.
मी मूळचा कोल्हापूरचा असून, मी माझा व्यवसाय सांभाळून गेल्या आठ वर्षांपासून एकट्याने भटकंती करत आहे. व्यवसायातून वेळ काढून मी एकट्याने फिरस्तीला निघतो, त्यामुळे एक वेगळाच आनंद मिळतो. एकट्याने प्रवास करण्याचा अनुभव खूप भारी असतो. वेगवेगळी माणसं भेटतात, विविध ठिकाणची जीवनशैली आणि संस्कृती जाणून घेता येते. मी प्रवास करताना नियोजन करतो. मी आत्तापर्यंत भारतातील 20 राज्य फिरलो तर नेपाळ, व्हिएतनाम असे देशही फिरलो आहे. – नरेन पाटील, युवा पर्यटक
सोला ट्रॅव्हलिंगची ठिकाणे…
महाराष्ट्रासह गोवा, राजस्थान, आसाम, गुजरात, उत्तर प्रदेश, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये तरुण एकट्याने भटकंतीसाठी जात आहेत. तर नेपाळ, भूतान, बांग्लादेश, युरोपातील देश, अफि—कन देश आदी ठिकाणी प्रवास केला जात आहेत.
Latest Marathi News सोलो ट्रॅव्हलिंगची तरुणाईत क्रेझ Brought to You By : Bharat Live News Media.