दुर्मीळ त्वचारोग झालेल्या बाळावर यशस्वी उपचार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अठरा वर्षांच्या गर्भवती महिलेने 2.8 किलो वजन असलेल्या मुलाला जन्म दिला. थोड्याशा स्पर्शानेही बाळाच्या त्वचेवरील थर निघत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. संपूर्ण तपासणीअंती बाळाला ’एपिडर्मोलिसिस बुलोसा’ हा अत्यंत दुर्मीळ त्वचारोग असल्याचे निदान झाले. कमला नेहरू रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करत बाळावर यशस्वी उपचार केले. बाळाला सुखरूप 26 जानेवारी रोजी घरी … The post दुर्मीळ त्वचारोग झालेल्या बाळावर यशस्वी उपचार appeared first on पुढारी.

दुर्मीळ त्वचारोग झालेल्या बाळावर यशस्वी उपचार

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : अठरा वर्षांच्या गर्भवती महिलेने 2.8 किलो वजन असलेल्या मुलाला जन्म दिला. थोड्याशा स्पर्शानेही बाळाच्या त्वचेवरील थर निघत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. संपूर्ण तपासणीअंती बाळाला ’एपिडर्मोलिसिस बुलोसा’ हा अत्यंत दुर्मीळ त्वचारोग असल्याचे निदान झाले. कमला नेहरू रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करत बाळावर यशस्वी उपचार केले. बाळाला सुखरूप 26 जानेवारी रोजी घरी सोडण्यात आले. नवजात बाळाच्या अंगावर बरेच फोड़ होते. तसेच त्वचेवरील थर सातत्याने निघत असल्याने त्याला उपचारांसाठी नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
त्यावेळी बाळाला पुसताना, उचलताना, दूध पाजताना, थोड्याशा स्पर्शानेही त्वचेला फोड येऊन त्वचा निघत असल्यामुळे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. बाळाच्या त्वचारोगाचे निदान होण्यासाठी त्वचेच्या आणि रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या. एनआयसीयूमध्ये उपचार करताना इंजेक्शनमधून औषधे देणे, त्वचेची स्वच्छता राखणे, जखमांची काळजी घेणे, साधारण तापमान ठेवणे, पोषणाची काळजी घेणे, बाळाला कमीत कमी हाताळणे अशी काळजी घेण्यात आली.
डॉ. स्मिता सांगडे म्हणाल्या, ’जखमांना जंतुसंसर्ग नाही होऊ नये, यासाठी डॉक्टरांनी बाळाला विलगीकरणात ठेवले होते. यशस्वी उपचार करून बाळ बरे झाल्यानंतर आईला बाळाला हाताळण्याचे, दूध पाजण्याचे आणि रोजची काळजी घेण्याचे शिकवण्यात आले. एपिडर्मोलिसिस बुलोसा हा अनुवंशिक आजार असून, तो नवजात 50,000 बाळांपैकी एकाला होतो. बाळावर यशस्वी उपचार करून 26 जानेवारी रोजी सुखरूप घरी सोडण्यात आले.’ वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरज वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सांगडे यांच्यासह डॉ. ईशा तिखे, डॉ. कृष्णा ग्रीष्मा यांनी उपचार केले.
जन्मादरम्यान बाळाचे वजन सुमारे 2.8 किलोग्रॅम होते. डॉ. स्मिता सांगडे आणि डॉ. ईशा तिखे यांना निरीक्षणादरम्यान बाळाला फोड आणि त्वचेची झीज होत असल्याचे दिसले. त्वचेच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. त्यावेळी बाळाला दुर्मीळ जनुकीय विकार असल्याचे निदान झाले. बाळावर प्रतिजैविकांच्या साहाय्याने उपचार करण्यात आले. आता बाळ बरे झाले आहे आणि 26 जानेवारी रोजी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
                                                           – डॉ. सुरज वाणी, वैद्यकीय अधीक्षक.
Latest Marathi News दुर्मीळ त्वचारोग झालेल्या बाळावर यशस्वी उपचार Brought to You By : Bharat Live News Media.