पोलीस असल्याचे सांगून निवृत्त शिक्षकाला एक लाखाचा गंडा

इगतपुरी(जि. नाशिक):पुढारी वृत्तसेवा-इगतपुरी शहर हद्दीतील जोगेश्वरी परिसरात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक सारंग चिमोटे हे दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास नाशिक येथे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान जुन्या मुंबई आग्रा महामार्गावरील मधुर-२ या सोसायटिसमोर मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्याने चीमोटे यांना व त्यांच्या साथीदाराला पोलिस असल्याची बतावणी करत फसवले. पुढे एका कडे पिस्तूल सापडला आहे. तुमच्या गळ्यातील व हातातील चैन … The post पोलीस असल्याचे सांगून निवृत्त शिक्षकाला एक लाखाचा गंडा appeared first on पुढारी.

पोलीस असल्याचे सांगून निवृत्त शिक्षकाला एक लाखाचा गंडा

इगतपुरी(जि. नाशिक):Bharat Live News Media वृत्तसेवा-इगतपुरी शहर हद्दीतील जोगेश्वरी परिसरात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक सारंग चिमोटे हे दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास नाशिक येथे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान जुन्या मुंबई आग्रा महामार्गावरील मधुर-२ या सोसायटिसमोर मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्याने चीमोटे यांना व त्यांच्या साथीदाराला पोलिस असल्याची बतावणी करत फसवले. पुढे एका कडे पिस्तूल सापडला आहे. तुमच्या गळ्यातील व हातातील चैन व अंगठी काढून माझ्याकडे द्या मी ती रुमालात बांधून देतो असे सांगत त्यांच्याकडून चैन व अंगठी काढून रुमालात बांधून दिले.
चोरटे निघून गेल्यावर चिमोटे यांनी रुमाल तपासला असता त्यात त्यांना चैन व अंगठी नसल्याचे लक्षात आले. सुमारे एक लाख पाच हजारांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले होते. त्यांनी तातडीने या प्रकरणी इगतपुरी पोलिस स्थानकात जाऊन घटना सांगितली. दरम्यान ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी या दोन्ही अज्ञात चोरट्याविरुद्ध इगतपुरी पोलिस स्थानकात  गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटिव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
हेही वाचा :

Nashik Lok Sabha Elections : नाशिक लोकसभेवर काँग्रेस, ठाकरे गटापाठोपाठ आता राष्ट्रवादीचाही दावा
Nashik News | त्वचाराेगतज्ज्ञ भासवून रुग्णाच्या नाकास गंभीर दुखापत
नाशिक : महापालिकेकडून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ ला सुरुवात

Latest Marathi News पोलीस असल्याचे सांगून निवृत्त शिक्षकाला एक लाखाचा गंडा Brought to You By : Bharat Live News Media.