घरफोडी करणार्यांना बेड्या ; 5 लाख 400 हजारांचा मुद्देमाल जप्त
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : घराचा कडी-कोयंडा तोडून चोरी करणार्या तिघांना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून, 5 लाख 40 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ऋषिकेश संतोष मोटे (वय 20), प्रदीप भागवत पौळ (वय 20 रा), कृष्णा भिमा पवळ (वय 19, तिघेही रा. फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांचे नाव आहे. ओंकार विलास जगताप (रा. खुटवड चौक, फुरसुंगी-भेकराई रोड) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
आरोपींनी 21 जानेवारी रोजी फिर्यादी यांच्या घराचा कड़ी – कोयंडा तोडुन घरात प्रवेश करुन घरातील सोन्याचे दागिने, डायमंड रिंग, रोख रक्कम व इतर साहित्य असे 3 लाख 40 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल घरफोडी चोरी केला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारा मा़र्फत मिळाले माहिती नुसार आरोपी ऋषिकेश मोटे, प्रदीप पौळ, कृष्णा पवळ यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली. तसेच हडपसर भागातून चोरून नेलेल्या 2 दुचाकीसह 5 लाख 40 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके गुन्हे निरीक्षक पोलिस निरीक्षक विश्वास डगळे, संदीप शिवले, यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलिस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतिबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे यांच्या पथकाने केली.
Latest Marathi News घरफोडी करणार्यांना बेड्या ; 5 लाख 400 हजारांचा मुद्देमाल जप्त Brought to You By : Bharat Live News Media.