मराठा आरक्षणात १५ पाने प्रश्नावली; कुटुंबाबाबत १८२ प्रश्नांचा समावेश

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा दहावी परीक्षांच्या तोंडावरच मराठा कुटुंबांच्या सर्वेक्षणाचे काम लागल्याने सिन्नर शहर व तालुक्यातील शाळांतील शिक्षक मेटाकुटीला आले आहेत. दहावीच्या पूर्वपरीक्षा सुरू असल्याने वर्गावर तर हजेरी लावावीच लागते. त्यामुळे सकाळी शाळेची कामे आटपून दुपारी आणि संध्याकाळी सर्वेक्षणासाठी घराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत पालिकेच्या इतर कर्मचा-यांप्रमाणे शिक्षकांनाही दि. २३ ते ३१ जानेवारी या … The post मराठा आरक्षणात १५ पाने प्रश्नावली; कुटुंबाबाबत १८२ प्रश्नांचा समावेश appeared first on पुढारी.

मराठा आरक्षणात १५ पाने प्रश्नावली; कुटुंबाबाबत १८२ प्रश्नांचा समावेश

नाशिक (सिन्नर) : Bharat Live News Media वृत्तसेवा
दहावी परीक्षांच्या तोंडावरच मराठा कुटुंबांच्या सर्वेक्षणाचे काम लागल्याने सिन्नर शहर व तालुक्यातील शाळांतील शिक्षक मेटाकुटीला आले आहेत. दहावीच्या पूर्वपरीक्षा सुरू असल्याने वर्गावर तर हजेरी लावावीच लागते. त्यामुळे सकाळी शाळेची कामे आटपून दुपारी आणि संध्याकाळी सर्वेक्षणासाठी घराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत
पालिकेच्या इतर कर्मचा-यांप्रमाणे शिक्षकांनाही दि. २३ ते ३१ जानेवारी या काळात प्रत्येकी सुमारे १५० ते २०० कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करायचे आहे. सर्वेक्षणात कुटुंबाबाबतच्या १८२ प्रश्नांचा समावेश आहे. शिवाय कुटुंबातील प्रत्येक सदस्याची वैयक्तिक माहिती रकान्यांच्या स्वरूपात भरायची आहे. अशी तब्बल १५ पाने प्रश्नावली सर्वेक्षणासाठी देण्यात आली आहेत. सर्व माहिती ॲपवर भरायची आहे. त्यानंतर ज्यांच्याकडून माहिती घेतली, त्यांना दाखवून त्यांच्या संगतीने सबमिट करायची आहे. त्याकरिता २० ते ३० मिनिटे सहज जात आहेत.
सध्या दहावीच्या पूर्वपरीक्षा सुरू आहेत. तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होतील. दहावीच्या परीक्षा तोंडावर असल्याने सर्वेक्षणासाठी चुकीची वेळ निवडण्यात आली आहे. एप्रिलमध्ये सर्वेक्षण ठेवले असते, तर विद्याथ्यांचे नुकसान झाले नसते आणि शिक्षकांची इतकी दमछाक झाली नसती. शिक्षकांची इतर काही प्रशिक्षणेती सुरू आहेत. त्यांच्याच माथी हे काम का मारले जाते? आमचा सर्वेक्षणाला विरोध नाही. ग्रसर्वेक्षणामाठी १०० ते २०० कुटुंबांकरिता १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. मग हे सर्वेक्षण त्या त्या परिसरातील स्वयंसेवी संस्थांकडून का करून घेतले जात नाही? असा सवाल शिक्षकांतून विचारला जात आहे.

दिनांक 23 जानेवारीला मराठा सर्वेक्षण सुरु होणे गरजेचे होते. परंतु सिन्नर शहरातील प्रगणकांचे मोबाइलमधील मराठा सर्वेक्षणाचे ॲप  दि .25 जानेवारी सकाळी 12 वाजले तरी सुरु झालेले नसल्याने यातून सर्वेक्षणाबाबत शासनाची उदासीनता यातून दिसून येत आहे. – संदीप सरोदे, उत्तर महाराष्ट्र संघटक, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना.

सर्वेक्षण करताना येणाऱ्या अडचणी
■ इंटरनेट गेल्यास पुन्हा सुरुवातीपासून अर्ज भरणे.
■ प्रगणकास मोबाइलचे जीपीएस सुरू ठेवावे लागते, त्यामुळे मोवाइलची बॅटरी लवकर संपते.
■ पॉवर बँक नसल्यास चार्जिंगसाठी पॉइंट शोधावा लागतो.
■ काही पर्यवेक्षकांना तांत्रिक माहिती नसल्याने प्रगणकांच्या समस्या लगेच सुटत नाहीत.
माहिती देण्यास नागरिकांना कंटाळा
प्रश्नावली मोठी असल्याने लोक माहिती देण्यास कंटाळा करीत असल्याचे निरीक्षण एका शिक्षकाने नोंदविले. एका कुटुंबातील व्यक्तीने सुरुवातीच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली. पण नंतर ते कंटाळले. पुढची माहिती मी देऊ शकत नाही. दिलेली माहितीही डिलिट करा असे सांगत त्यांनी पुढील माहिती देण्यास नकार दिल्याचे त्या शिक्षकाने सांगितले.
Latest Marathi News मराठा आरक्षणात १५ पाने प्रश्नावली; कुटुंबाबाबत १८२ प्रश्नांचा समावेश Brought to You By : Bharat Live News Media.