अक्षय कुमारची हिरोईन एमी जॅक्सनने केला साखरपुडा (Pics)
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : साऊथ आणि हिंदी चित्रपटातून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री एमी जॅक्सनने (Amy Jackson) आपल्या बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे. तिने लॉन्गटाईम बॉयफ्रेंड Ed Westwick सोबत साखरपुडा केला. या दोघांचे खूप सुंदर फोटोज सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. (Amy Jackson)
संबंधित बातम्या –
film 12th Fail फेम विक्रांत मेस्सी ट्रॉफी घेऊन आयपीएस मनोज शर्मांच्या भेटीला
Pushpa 2 : अखेर ठरलं! अल्लू अर्जून- रश्मिकाच्या ‘पुष्पा २’ ची रिलीज डेट
Filmfare : आनंद एल राय यांची रेड कार्पेटवर हजेरी; ‘नखरेवाली’ स्टारही सोबत
एमी जॅक्सनने ‘गॉसिप गर्ल’ फेम हॉलीवुड अभिनेता Ed Westwick सोबत आपल्या रिलेशनशीपवर शिक्कामोर्तब केल होता. एमी आणि Ed Westwick यांचे रोमँटिक फोटोजदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळचे त्यांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
Ed Westwick ने एमीला केलं प्रपोज
Ed Westwick लेडी लव एमी जॅक्सनला स्विट्जरलँडच्या सुंदर जगात प्रपोज केलं. त्याने स्विट्जरलँडच्या ब्रिजवर गुडघ्यावर बसून एमीला प्रपोज केलं. हे पाहून एमी भावूक झाली. तिने आपल्या बॉयफ्रेंडचे प्रपोजल मान्य केलं.
एमीने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सोबत ‘सिंग इज ब्लिंग’ मध्ये काम केलं होतं.
View this post on Instagram
A post shared by Amy Jackson (@iamamyjackson)
Latest Marathi News अक्षय कुमारची हिरोईन एमी जॅक्सनने केला साखरपुडा (Pics) Brought to You By : Bharat Live News Media.