तब्बल 385 दशलक्ष वर्षांपूर्वीचे जंगल

न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील शास्त्रज्ञांना एका प्राचीन जंगलाचा शोध लागला आहे. हे जंगल तब्बल 385 दशलक्ष वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यूयॉर्कच्या एका खाणीजवळील ‘कैरो साईट’ नावाने ओळखल्या जाणार्‍या ठिकाणी या प्राचीन जंगलाचे अवशेष दिसून आले. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. या संशोधनातून पृथ्वीवरील अनेक रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. ‘करंट … The post तब्बल 385 दशलक्ष वर्षांपूर्वीचे जंगल appeared first on पुढारी.

तब्बल 385 दशलक्ष वर्षांपूर्वीचे जंगल

न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील शास्त्रज्ञांना एका प्राचीन जंगलाचा शोध लागला आहे. हे जंगल तब्बल 385 दशलक्ष वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यूयॉर्कच्या एका खाणीजवळील ‘कैरो साईट’ नावाने ओळखल्या जाणार्‍या ठिकाणी या प्राचीन जंगलाचे अवशेष दिसून आले. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. या संशोधनातून पृथ्वीवरील अनेक रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
‘करंट बायोलॉजी’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्कपासून दोन तासांच्या अंतरावरच या प्राचीन जंगलाचे अवशेष आहेत. येथील खडक सुमारे 38 कोटी वर्षे जुने आहेत. या खडकांच्या खाली मोठ्या जागेत या जंगलाच्या जीवाश्मांचा खजिना आहे. म्हणजे लाखो वर्षे ते दडपले गेले. इथे अशी जंगले आहेत, जी डायनासोरनेदेखील पाहिली असतील. हे ठिकाण पाहिल्यानंतर सुरुवातीला संशोधकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. हे जंगल न्यूयॉर्कमधील जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर आहे.
एकेकाळी हे जंगल सुमारे 250 मैलांच्या परिसरात पसरले होते. सध्या फुटबॉल मैदानाच्या निम्मे क्षेत्रफळ असलेल्या या भागात अतिशय लहान जागेवर काम केले. संशोधकांच्या मते, जेव्हा तुम्ही इथून जाता तेव्हा तुम्ही जुन्या झाडांच्या मुळांवरून जात आहात. हे ठिकाण अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्ट किंवा जपानच्या याकुशिमा जंगलासारखे मानले जाते. सध्या लोकांना या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. इथे केवळ शास्त्रज्ञांना अभ्यासासाठी जाण्याची परवानगी आहे. त्या काळातील अनेक रहस्ये इथे दडली असण्याची शक्यता आहे. अपेक्षा आहे की, शास्त्रज्ञांच्या संशोधनानंतर यातील बरीचशी गुपिते जगासमोर येतील.
Latest Marathi News तब्बल 385 दशलक्ष वर्षांपूर्वीचे जंगल Brought to You By : Bharat Live News Media.