कोल्हापूर जिल्ह्यातील 3 लाख 69 हजार मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. मच्छिंद्रनाथ तांबे यांनी कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका आणि जिल्ह्यातील सर्वेक्षणाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील 3 लाख 69 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा सहायक नोडल अधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी बैठकीत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी मराठा आरक्षणाच्या … The post कोल्हापूर जिल्ह्यातील 3 लाख 69 हजार मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण appeared first on पुढारी.

कोल्हापूर जिल्ह्यातील 3 लाख 69 हजार मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. मच्छिंद्रनाथ तांबे यांनी कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका आणि जिल्ह्यातील सर्वेक्षणाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील 3 लाख 69 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा सहायक नोडल अधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी बैठकीत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने 1960 ते 2020 या कालावधीतील जमीन धारणेविषयीची माहिती आयोगाचे सदस्य प्रा. तांबे यांनी घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिकेच्या आयुक्त डॉ. के. मंजुलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तहसीलदार जयवंत पाटील तसेच कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. मराठा समाजाच्या सर्वेक्षणात येणार्‍या अडचणी सदस्य प्रा. तांबे यांनी जाणून घेतल्या.या अडचणी दूर करण्यासाठी आयोगाकडून तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार व आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील मराठा सर्वेक्षणाच्या सद्यस्थितीची माहिती दिली.
महानगरपालिका क्षेत्र वगळून
कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्र वगळून 6 लाख 79 हजार 243 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे नियोजित आहे. 28 जानेवारीपर्यंत 3 लाख 69 हजार 224 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
Latest Marathi News कोल्हापूर जिल्ह्यातील 3 लाख 69 हजार मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण Brought to You By : Bharat Live News Media.