गॅस गळतीच्या आगीत आजी,नातवाचा मृत्यू

बेळगाव : सिलिंडरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडून जखमी झालेल्या पाच जणांपैकी आजी आणि नातू अशा दोघांचा सोमवारी (दि.29) एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. हेमंत मोहन भट (वय 27) आणि त्याची आजी कमलाक्षी गोपाळकृष्ण भट (वय 76) अशी त्यांची नावे आहेत. तर ललिता मोहन भट (वय 48) आणि गोपाळकृष्ण भट (वय … The post गॅस गळतीच्या आगीत आजी,नातवाचा मृत्यू appeared first on पुढारी.

गॅस गळतीच्या आगीत आजी,नातवाचा मृत्यू

बेळगाव : सिलिंडरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडून जखमी झालेल्या पाच जणांपैकी आजी आणि नातू अशा दोघांचा सोमवारी (दि.29) एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. हेमंत मोहन भट (वय 27) आणि त्याची आजी कमलाक्षी गोपाळकृष्ण भट (वय 76) अशी त्यांची नावे आहेत. तर ललिता मोहन भट (वय 48) आणि गोपाळकृष्ण भट (वय 80) या दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
रविवार असल्याने पूर्ण भट कुटुंबीय बसवाण गल्लीतील आपल्या घरात होते. सायंकाळी गॅस सुरू करण्यासाठी गेल्यानंतर आगीचा भडका उडाला. त्यात भट कुटुंबातील पाच जण सापडले.
 
Latest Marathi News गॅस गळतीच्या आगीत आजी,नातवाचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.