शीतपेयात विष घालून बापाने केला मुलाचा खून

सोलापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : शाळेत खोड्या करतो आणि वारंवार मोबाईल मागतो म्हणून बापानेच स्वतःच्याच मुलास शीतपेयात (कोल्ड्रिंक्स) विष घालून जीवे मारल्याची घटना सोलापुरात घडली. विशाल विजय बट्टू (वय 14 , रा. भवानी पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी विशाल याचे वडील विजय सिद्राम बट्टू (वय 43 रा. भवानी पेठ,) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
विशालची आई कीर्ती विजय बट्टू (33, रा. भवानी पेठ) हिने जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. की, कीर्ती यांचे पती विजय बट्टू याला मुलगा विजय बट्टू विषयी शाळेतील सततच्या तक्रारी, अभ्यास न करणे, घरात व शाळेत खोड्या करणे, सतत मोबाईल पाहणे या गोष्टीचा राग मनात होता. विजयने 13 जानेवारी रोजी सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील नाल्याजवळ आपल्या मोटारसायकलवर नेवून मुलास कोल्ड्रिंक्समध्ये सोडियम नायट्रेट हे विष देऊन त्याचा खून केला.
Latest Marathi News शीतपेयात विष घालून बापाने केला मुलाचा खून Brought to You By : Bharat Live News Media.
