पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा ६ विकेट्सने पराभव करत भारताचे स्वप्नभंग केले आहे. कांगारूंनी सहाव्यांदा विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. (World Cup 2023 Final). मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने भावनिक पोस्ट केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,”खेळाडू, चाहते आणि हितचिंतक यांच्या यातना आणि त्यांना काय त्रास होत असेल याची मी कल्पना करू शकतो.” (World Cup 2023)
World Cup 2023 : पराभव हा खेळाचा एक भाग…
सचिन तेंडूलकरने आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की, सहाव्या विश्वचषक विजयाबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन. सर्वात मोठ्या स्टेजच्या सर्वात महत्वाच्या दिवशी त्यांनी चांगले क्रिकेट खेळले. टीम इंडियासाठी शुभेच्छा, अन्यथा स्टर्लिंग स्पर्धेत फक्त एक वाईट दिवस हृदयद्रावक असू शकतो. खेळाडू, चाहते आणि हितचिंतक यांच्या यातना आणि त्यांना काय त्रास होत असेल याची मी कल्पना करू शकतो. पराभव हा खेळाचा एक भाग आहे परंतु आपण लक्षात ठेवूया की या टिमने संपूर्ण स्पर्धेत आपल्यासाठी सर्व प्रचत्नाने दिले आहे.”
विश्वचषकाच्या फायनलमध्ये नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (19 नोव्हेंबर) कांगारू संघाने भारतीय संघाचा सहा गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकून सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर भारतीय खेळाडूंसह अनेक क्रिकेटप्रेमींना अश्रू अनावर झाले.
Congratulations to Australia on their sixth World Cup win. On the most important day of the biggest stage, they played better cricket.
Hard luck Team India, just one bad day in an otherwise sterling tournament can be heartbreaking. I can imagine the agony of the players, fans…
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 20, 2023
The feeling of winning a trophy 🏆 for your country is different. I am proud of my entire team and I am happy that I am a part of this team Australia 🇦🇺#Champions #CWC23Final pic.twitter.com/xNBQJuksFO
— Travis Head (@ImTravisHead) November 19, 2023
हेही वाचा
भारताचे स्वप्नभंग; ऑस्ट्रेलियाची सहाव्यांदा विश्वचषकावर मोहरWC 2023
Final Photos : विराटवर अनुष्का नाराज, राहूलची विकेट पाहून अथियाचा चेहरा फिका; पाहा सामन्यात काय झालं?
Pat Cummins : पॅट कमिंसने शब्द खरा करुन दाखवला; भारतीय प्रेक्षकांमध्ये पिनड्रॉप सायलेंस
भारताचे स्वप्नभंग; ऑस्ट्रेलियाची सहाव्यांदा विश्वचषकावर मोहर
World Cup 2023 मधील १० ठळक घडामाेडी, जाणून घ्या सविस्तर
विराटवर अनुष्का नाराज, राहूलची विकेट पाहून अथियाचा चेहरा फिका; पाहा सामन्यात काय झालं?
The post “एक वाईट दिवस…” सचिन तेंडूलकरची भावनिक पोस्ट चर्चेत appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा ६ विकेट्सने पराभव करत भारताचे स्वप्नभंग केले आहे. कांगारूंनी सहाव्यांदा विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. (World Cup 2023 Final). मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने भावनिक पोस्ट केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,”खेळाडू, चाहते आणि हितचिंतक यांच्या यातना आणि …
The post “एक वाईट दिवस…” सचिन तेंडूलकरची भावनिक पोस्ट चर्चेत appeared first on पुढारी.