नैताळे यात्रौत्सवातील मद्यविक्रीविरोधात महिलांचा मोर्चा

निफाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- निफाड तालुक्यातील नैताळे येथे श्री मतोबा महाराज यात्रोत्सवात अवैध मद्यविक्री सुरू असल्याने ती तात्काळ बंद करावी या मागणीसाठी संतप्त महिलांनी येथील पोलिस चौकीवर मोर्चा काढत विक्रेत्यांवर कडक कारवाईची मागणी केली. महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, नाशिक- संभाजीनगर महामार्गावरील नैताळे येथे श्री मतोबा महाराजाचा यात्रोत्सव 25 जानेवारीपासून सुरू झाला आहे. … The post नैताळे यात्रौत्सवातील मद्यविक्रीविरोधात महिलांचा मोर्चा appeared first on पुढारी.

नैताळे यात्रौत्सवातील मद्यविक्रीविरोधात महिलांचा मोर्चा

निफाड (जि. नाशिक) : Bharat Live News Media वृत्तसेवा- निफाड तालुक्यातील नैताळे येथे श्री मतोबा महाराज यात्रोत्सवात अवैध मद्यविक्री सुरू असल्याने ती तात्काळ बंद करावी या मागणीसाठी संतप्त महिलांनी येथील पोलिस चौकीवर मोर्चा काढत विक्रेत्यांवर कडक कारवाईची मागणी केली.
महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, नाशिक- संभाजीनगर महामार्गावरील नैताळे येथे श्री मतोबा महाराजाचा यात्रोत्सव 25 जानेवारीपासून सुरू झाला आहे. हा उत्सव १५ दिवस चालणार आहे. मात्र यात्रोत्सवात अनेक ठिकाणी विनापरवाना मद्यविक्री होत होत आहे. शहरातील झोपडपट्टी परिसरात मद्यविक्री जोरात सुरू आहे. त्यामुळे रहिवाशाना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत दारुबंदी ठराव पास करण्यात आलेला आहे. तरीही येथे मद्यविक्री सुरूच असल्याचे म्हटले आहे. निवेदनावर दिव्या सुराशे, अश्विनी माळी, पूजा सुराशे, रेखा सुराशे, पूजा सुराशे, अश्विनी माळी, ज्योती पगारे, पूजा सुराशे, सुवर्णा सुराशे, भारती सुराशे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निफाड पोलिसाना महिलांचे निवेदन मिळाले असून याबाबत चौकशी केली जात आहे, दोषीवर योग्य कारवाई केली जाईल. – नंदकुमार कदम, पोलिस निरिक्षक, निफाड पोलिस ठाणे.
हेही वाचा :

परभणी: खोटे जात वैधता प्रमाणपत्र: जिंतूरमध्ये गोर सेनेचा रास्ता रोको
ओबीसींनी घाबरू नये, हरकती नोंदवल्या जाणार आहेत : चंद्रशेखर बावनकुळे
विदर्भातून ५० हजार कोटींची मत्स्योत्पादन निर्यात शक्य : नितीन गडकरी

Latest Marathi News नैताळे यात्रौत्सवातील मद्यविक्रीविरोधात महिलांचा मोर्चा Brought to You By : Bharat Live News Media.