भाजप सरकारमध्ये असताना ओबीसींवर अन्याय होणार नाही: फडणवीस

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण जाहीर करताना ओबीसींवर अन्याय झाल्याची भावना ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल विमानतळावर माध्यमांशी बोलताना स्पष्ट भूमिका मांडली. Devendra Fadnavis भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे, तोवर काहीही झाले तरी आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. उद्या अशी वेळ आली की, … The post भाजप सरकारमध्ये असताना ओबीसींवर अन्याय होणार नाही: फडणवीस appeared first on पुढारी.

भाजप सरकारमध्ये असताना ओबीसींवर अन्याय होणार नाही: फडणवीस

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण जाहीर करताना ओबीसींवर अन्याय झाल्याची भावना ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल विमानतळावर माध्यमांशी बोलताना स्पष्ट भूमिका मांडली. Devendra Fadnavis
भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे, तोवर काहीही झाले तरी आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. उद्या अशी वेळ आली की, आम्हाला ओबीसींना संरक्षण देता येत नाही तर, मी स्वतः माझ्या वरिष्ठांशी बोलेन. काहीही झाले तरी ओबीसींवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. भुजबळांच्या राज्य सरकारवरील नाराजीबद्दल विचारले असता मी त्यांच्याशी बोलणार असून दोन्ही बाजूने मीडियात बोलताना संयम ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. Devendra Fadnavis
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर त्यांचे जे काही आक्षेप असतील, ते त्यांनी सांगावे. कुठेही ओबीसींवर अन्याय होत असेल, तर आवश्यकता असेल, तिथे सुधारणा करू. परंतु, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील हीच भूमिका आहे. आम्हाला ओबीसींचे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करावेच लागेल. मुख्यमंत्र्यांचेही तेच म्हणणे आहे, असेही फडणवीस म्हणाले. नथुराम गोडसे संदर्भातील प्रश्नावर मला कोण काय बोलले, हे मला माहीत नसल्याने त्यांनी सांगितले.
हेही वाचा 

नागपूर : नेदरलँडच्या कंपनीचा म‍िहानमध्‍ये २०० कोटींचा प्रकल्‍प
नागपूर: फडणवीस यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल प्रदान  
नागपूर : संविधान चौकात अंगणवाडी सेविकांनी भरवली शाळा

Latest Marathi News भाजप सरकारमध्ये असताना ओबीसींवर अन्याय होणार नाही: फडणवीस Brought to You By : Bharat Live News Media.