परभणी: खोटे जात वैधता प्रमाणपत्र: जिंतूरमध्ये गोर सेनेचा रास्ता रोको

जिंतूर: पुढारी वृत्तसेवा : विमुक्त जाती-अ प्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र दिले जात आहे. असे प्रमाणपत्र घेणाऱ्या व वितरीत करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर विशेष तपासणी पथक नियुक्त करून कारवाई करावी, या मागणीसाठी गोर सेनेच्या वतीने आज (दि.२९) वसंतराव नाईक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. Parbhani जात वैधता प्रमाणपत्राबाबत बंजारा समाजाकडून अनेक दिवसांपासून संघर्ष … The post परभणी: खोटे जात वैधता प्रमाणपत्र: जिंतूरमध्ये गोर सेनेचा रास्ता रोको appeared first on पुढारी.

परभणी: खोटे जात वैधता प्रमाणपत्र: जिंतूरमध्ये गोर सेनेचा रास्ता रोको

जिंतूर: Bharat Live News Media वृत्तसेवा : विमुक्त जाती-अ प्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र दिले जात आहे. असे प्रमाणपत्र घेणाऱ्या व वितरीत करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर विशेष तपासणी पथक नियुक्त करून कारवाई करावी, या मागणीसाठी गोर सेनेच्या वतीने आज (दि.२९) वसंतराव नाईक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. Parbhani
जात वैधता प्रमाणपत्राबाबत बंजारा समाजाकडून अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशन विमुक्त जाती (अ) मध्ये होत असलेल्या अवैध घुसखोरी रोखण्यासाठी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चामध्ये महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले होते. मात्र, मंत्री निवेदन स्वीकारण्यासाठी आले नव्हते. Parbhani
दरम्यान आज गोर सेनेने रस्त्यावर उतरत आंदोलन केले. आंदोलनात अध्यक्ष संदेश चव्हाण, विजय आडे संगीताबाई जाधव, दीपक चव्हाण, दिगंबर जाधव, अॅड. विनोद राठोड, राजूभाऊ चव्हाण, डॉ. राजेश चव्हाण, कैलास चव्हाण, विजय चव्हाण, उद्धव पवार, लक्ष्मीबाई राठोड, व्ही.पी. राठोड, अविनाश चव्हाण, विजयकुमार पवणे, संतोष राठोड, संतोष आढे आदीसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
विमुक्त जाती ‘अ’ व गोर सेनेच्या आंदोलनाची सुरूवात जिंतूर शहरातील बस स्थानक येथून मोर्चा काढून करण्यात आली. मोर्चा शहरातील वसंतराव नाईक चौकापर्यंत पोहोचला. याठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार राजेश सरवदे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
हेही वाचा 

परभणी: जिंतूर तहसिल कार्यालयापुढे तहसीलदारांच्या गाडीला आग
परभणी : शेतरस्ता खुला द्यावा, या मागणीसाठी शेतक-यांचे उपोषण
परभणी : गंगाखेड शहराच्या मुख्य बाजारपेठेतील दोन दुकाने जळून खाक

Latest Marathi News परभणी: खोटे जात वैधता प्रमाणपत्र: जिंतूरमध्ये गोर सेनेचा रास्ता रोको Brought to You By : Bharat Live News Media.