टीम इंडियाच्‍या मुख्‍य प्रशिक्षकपदी राहणार का? राहुल द्रविड म्‍हणाले…

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेतील अंतिम सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाने भारताचा पराभव करत विश्‍वचषकावर आपलं नाव कोरलं. या पराभवामुळे कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्‍यांचा पुन्‍हा एकदा विश्‍वचषक जिंकण्‍याचा स्‍वप्‍नाचा चुराडा झाला. आता या पराभवानंतर भारतीय संघाच्‍या कामगिरीचे विश्‍लेषण होत असतानाच आता मुख्‍य प्रशिक्षकपदी (chief coach) कायम राहणार का, या प्रश्‍नाचे उत्तर स्‍वत: राहुल द्रविड ( Rahul … The post टीम इंडियाच्‍या मुख्‍य प्रशिक्षकपदी राहणार का? राहुल द्रविड म्‍हणाले… appeared first on पुढारी.

टीम इंडियाच्‍या मुख्‍य प्रशिक्षकपदी राहणार का? राहुल द्रविड म्‍हणाले…

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेतील अंतिम सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाने भारताचा पराभव करत विश्‍वचषकावर आपलं नाव कोरलं. या पराभवामुळे कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्‍यांचा पुन्‍हा एकदा विश्‍वचषक जिंकण्‍याचा स्‍वप्‍नाचा चुराडा झाला. आता या पराभवानंतर भारतीय संघाच्‍या कामगिरीचे विश्‍लेषण होत असतानाच आता मुख्‍य प्रशिक्षकपदी (chief coach) कायम राहणार का, या प्रश्‍नाचे उत्तर स्‍वत: राहुल द्रविड ( Rahul Dravid ) यांनीच रविवारी (दि.१९) झालेल्‍या पत्रकार परिषदेत दिले.
२०२१ च्‍या विश्‍वचषक स्‍पर्धेनंतर रवी शास्‍त्री यांच्‍या जागी राहुल द्रविड यांना प्रशिक्षक बनवण्‍यात आले होते. आता भारतीय संघाचे मुख्‍य प्रशिक्षक म्हणून त्‍यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ हा विश्वचषकानंतर संपत आला. याबाबत त्‍यांना पत्रकार परिषदेत विचारणा करण्‍यात आल्‍यावर राहुल द्रविड म्‍हणाले की, “मी पुढे काय करणार याचा विचार करायला मला वेळ मिळाला नाही, कारण माझे संपूर्ण लक्ष विश्वचषकावर होते. सामना संपल्यानंतर मी थेट पत्रकार परिषदेला आलो आहे. खरे सांगायचे तर मी माझ्या कामाचे मूल्यमापन करणारी व्यक्ती नाही. मी गेल्या दोन वर्षांत सर्व फॉरमॅटमध्ये ज्या खेळाडूंसोबत काम केले ते सर्व माझ्यासाठी खूप चांगले अनुभव आहेत.
एक प्रशिक्षक म्‍हणून हे पाहणे खूपच अवघड…
अंतिम सामन्‍यातील पराभवावर बोलताना द्रविड म्‍हणाले की, ड्रेसिंग रूममधलं वातावरण खूप वेगळं असतं, खेळाडू भावूक होत असल्याचंही राहुल द्रविड म्हणाला. एक प्रशिक्षक म्हणून हे सर्व पाहणे माझ्यासाठी खूप अवघड आहे.”
रोहित शर्मा एक महान कर्णधार
कर्णधार रोहित शर्मा याच्‍याबाबत बोलताना ते म्‍हणो की, रोहित हा ड्रेसिंग रुममध्‍ये खूप चांगले वातावरण ठेवतो. तो खूप मेहनत करतो आणि गेल्या काही वर्षांत त्याने संघासाठी वैयक्तिक वेळही दिला आहे. तो एक महान कर्णधार आहे आणि त्याच्याबद्दल माझ्याकडे फक्त चांगल्या गोष्टी आहेत.
हेही वाचा : 

Australia in WC Final : द. आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’! निसटता विजय मिळवत ऑस्ट्रेलियाची आठव्यांदा फायनलमध्ये धडक
Sehar Shinwari : भारताचा पराभव झाल्यास झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करणार! ‘पाक’ अभिनेत्रीचे अजब विधान

 
The post टीम इंडियाच्‍या मुख्‍य प्रशिक्षकपदी राहणार का? राहुल द्रविड म्‍हणाले… appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेतील अंतिम सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाने भारताचा पराभव करत विश्‍वचषकावर आपलं नाव कोरलं. या पराभवामुळे कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्‍यांचा पुन्‍हा एकदा विश्‍वचषक जिंकण्‍याचा स्‍वप्‍नाचा चुराडा झाला. आता या पराभवानंतर भारतीय संघाच्‍या कामगिरीचे विश्‍लेषण होत असतानाच आता मुख्‍य प्रशिक्षकपदी (chief coach) कायम राहणार का, या प्रश्‍नाचे उत्तर स्‍वत: राहुल द्रविड ( Rahul …

The post टीम इंडियाच्‍या मुख्‍य प्रशिक्षकपदी राहणार का? राहुल द्रविड म्‍हणाले… appeared first on पुढारी.

Go to Source