कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्याच्या मतमोजणीस सुरूवात
राशिवडे ; पुढारी वृत्तसेवा भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला आज (सोमवार) सकाळी आठ वाजता सुरूवात झाली. यामध्ये सर्वप्रथम कौलव ‘राशिवडे पूर्ण गट आणि कसबा तारळे गावातील गटातील काही गावांच्या पेट्या ताब्यात घेऊन उघडण्यात आल्या. यामधील 10200 मतपत्रिका बाहेर काढून त्यांचे शॉर्टिंग केले. 36 टेबलांवर हे काम सुरू असून, ही मतमोजणी दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. दुसऱ्या फेरीत 13572 मतदान मोजले जाईल.
सकाळी नऊ वाजता प्रत्यक्ष मतपत्रिका शॉर्टिंग करून त्यांचे गठ्ठे बांधण्याचे काम सुरू झाले. आतापर्यंत सर्व गठ्ठे बांधून गट क्रमांक एक कौलव पासून याची मतमोजणी सुरू होणार आहे. 21 गावातील मतदारांचा कौल आता हळूहळू दिसू लागेल. सायंकाळी चार वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण करण्याची तयारी निवडणूक विभागाने केली आहे.
बोलक्या चिठ्ठ्याचा खच
कारखान्याच्या कारभारासह तिन्ही पँनेलच्या नेत्यांवर चिठ्ठ्याचा मोठ्या प्रमाणात मार्मीक मारा करण्यात आला आहे. त्यामुळे सभासदांमधील रोष दिसून येतो.
The post कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्याच्या मतमोजणीस सुरूवात appeared first on पुढारी.
राशिवडे ; पुढारी वृत्तसेवा भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला आज (सोमवार) सकाळी आठ वाजता सुरूवात झाली. यामध्ये सर्वप्रथम कौलव ‘राशिवडे पूर्ण गट आणि कसबा तारळे गावातील गटातील काही गावांच्या पेट्या ताब्यात घेऊन उघडण्यात आल्या. यामधील 10200 मतपत्रिका बाहेर काढून त्यांचे शॉर्टिंग केले. 36 टेबलांवर हे काम सुरू असून, ही मतमोजणी दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. दुसऱ्या …
The post कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्याच्या मतमोजणीस सुरूवात appeared first on पुढारी.