उत्तरकाशीत बोगद्यात भूस्खलन; कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल : नरेंद्र मोदी
पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात गेली १० दिवस अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याचे ऑपरेशन सुरु आहे. याबबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत म्हटलं आहे की,” कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल. अडकलेल्या कामगारांचे मनोधैर्य राखण्याची गरज आहे.” (Uttarkashi tunnel rescue)
Uttarkashi tunnel rescue : मनोधैर्य राखण्याची गरज : पंतप्रधान
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या मदत आणि बचाव कार्याची माहिती पंतप्रधानांनी घेतली. या चर्चेसंदर्भात माध्यमांशी बोलत असताना पुष्कर सिंह धामी म्हणाले की,”पीएम मोदी म्हणाले की, केंद्र सरकारकडून आवश्यक बचाव उपकरणे आणि संसाधने पुरविली जात आहेत. केंद्र आणि राज्य संस्थांच्या परस्पर समन्वयाने कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल. अडकलेल्या कामगारांचे मनोधैर्य राखण्याची गरज आहे. “
बचावकार्य सुरुच
उत्तराखंडच्या सिल्क्यारा येथील गेली १० दिवस बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरुच आहे. आतापर्यंत केवळ २४ मीटरपर्यंत पाइप ढिगाऱ्यात पोहोचली आहे. ड्रिलिंग दरम्यान हादऱ्याने बचावपथकाच्या दिशेने आणखी ढिगारा कोसळल्याने शुक्रवारी (दि. १७) सायंकाळच्या दरम्यान बचावकार्य ठप्प झाले होते. ड्रिलिंगसाठी अमेरिकेन ऑगर मशीनमध्येही तांत्रिक बिघाड झाल्याने अडथळा येत होता. रविवारी (दि.२०) माहिती दिली की, ” कामगारांना बाहेर काढण्यासाठी आणखी चार दिवसांचा कालावधी लागणार आहे”
हेही वाचा
IND v AUS, Wold Cup Final : ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत…’: वर्ल्डकप पराभवानंतर टीम इंडियासाठी पंतप्रधानांचे ट्विट
Miss Universe 2023 | शेनिस पॅलासिओसने जिंकला मिस युनिव्हर्स २०२३ चा किताब, ठरली निकाराग्वाची पहिली महिला
ICC World Cup Final 2023 | टीम इंडिया ‘विजयी भवः’, देशभरात प्रार्थना अन् होमहवन, कुठे आरती, तर कुठे ढोल- ताशाचा गजर
The post उत्तरकाशीत बोगद्यात भूस्खलन; कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल : नरेंद्र मोदी appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात गेली १० दिवस अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याचे ऑपरेशन सुरु आहे. याबबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत म्हटलं आहे की,” कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल. अडकलेल्या कामगारांचे मनोधैर्य राखण्याची गरज आहे.” (Uttarkashi tunnel rescue) Uttarkashi tunnel rescue : मनोधैर्य राखण्याची गरज …
The post उत्तरकाशीत बोगद्यात भूस्खलन; कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल : नरेंद्र मोदी appeared first on पुढारी.