बिहारमध्ये सत्तेवर येताच NDA सरकार ॲक्शन मोडवर! RJD विरुद्ध पहिली कारवाई

पुढारी ऑनलाईन : बिहारमध्ये (Bihar) नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा कोलांटी उडी मारत भाजपसोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीए सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. त्यांनी आरजेडी विरोधात पहिली कारवाई केली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील अनेक आमदारांनी विधानसभेचे अध्यक्ष आरजेडी नेते अवध बिहारी चौधरी यांना हटवण्यासाठी विधानसभा सचिवांना अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे. भाजप … The post बिहारमध्ये सत्तेवर येताच NDA सरकार ॲक्शन मोडवर! RJD विरुद्ध पहिली कारवाई appeared first on पुढारी.

बिहारमध्ये सत्तेवर येताच NDA सरकार ॲक्शन मोडवर! RJD विरुद्ध पहिली कारवाई

Bharat Live News Media ऑनलाईन : बिहारमध्ये (Bihar) नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा कोलांटी उडी मारत भाजपसोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीए सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. त्यांनी आरजेडी विरोधात पहिली कारवाई केली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील अनेक आमदारांनी विधानसभेचे अध्यक्ष आरजेडी नेते अवध बिहारी चौधरी यांना हटवण्यासाठी विधानसभा सचिवांना अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे.
भाजप नेते नंद किशोर यादव आणि तारकिशोर प्रसाद (माजी उपमुख्यमंत्री); हिंदुस्तानी आवाम मोर्चा (HAM) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी; जेडीयूचे विनय कुमार चौधरी, रत्नेश सदा आणि एनडीए (NDA) आघाडीतील इतर आमदारांनी अवध बिहारी चौधरी यांना पदावरून हटवण्यासाठी नोटीस दिली आहे.
नितीशकुमार यांनी रविवारी महाआघाडी सरकारचे घटक असलेल्या आरजेडी आणि काँग्रेसशी संबंध तोडले आणि विक्रमी नवव्यांदा एनडीए आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यामुळे नितीशकुमार यांच्या सोबत सत्तेत येण्याची भाजपला संधी मिळाली.
या राजकीय घडामोडींमुळे बिहारमध्ये एनडीएकडे १२८ आमदार आहेत. जे बहुमतांपेक्षा ६ अधिक आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी (महागठबंधन) तील आरजेडी, काँग्रेस आणि इतर मिळून ११४ आमदार आहेत.
२४३ जागा असलेल्या बिहार विधानसभेत आरजेडी (RJD) ७९ आमदारांसह सर्वात मोठा पक्ष आहे. तर भाजपकडे ७८, जेडीयू ४५ आणि काँग्रेसकडे १९ आमदार आहेत.
डाव्या पक्षांकडे १६ आमदार आहेत. तर हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि एम AIMIM कडे अनुक्रमे ४ आणि १ आमदार आहेत. बिहार विधानसभा सभागृहात १ अपक्ष आमदारही आहे. (Bihar)
हे ही वाचा :

नितीश कुमारांची शपथविधीनंतर पहिली प्रतिक्रिया, ‘स्‍वगृही परतलो….’
नितीश कुमार यांच्या पक्षाबद्दल तेजस्वी यादवांचे भाकीत म्हणाले, ‘जेडी(यू) संपेल…’
नितीशकुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा शपथबद्ध
“कचरा पुन्‍हा कचराकुंडित …” : लालूंच्‍या कन्‍येचा नितीश कुमारांवर घणाघाती हल्‍ला

 
The post बिहारमध्ये सत्तेवर येताच NDA सरकार ॲक्शन मोडवर! RJD विरुद्ध पहिली कारवाई appeared first on Bharat Live News Media.

Go to Source