राहुल गांधींना शून्यावर बाद करणार : रामदास आठवले
पुणे : पुढारी वृत्तसेवा : राजकारणाच्या खेळात तयारी करून खेळायचे असते. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी 2024 ची चांगली तयारी केली असून, आम्ही 350 धावा करणार आहोत. विशेष म्हणजे राहुल गांधी यांना मी शून्यावर कॅच ऑऊट करणार आहे, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राजकीय फटकेबाजी केली. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी इंडिया आघाडी प्रयत्न करत आहेत. काँग्रेसच्या विरोधात भ—ष्टाचाराची बाजू मांडून एनडीएचे सरकार आणू. सगळ्या पक्षांचे लोक एकत्रित येत आहेत. त्यांना शिव्या देतात. काही जण व्यक्तिगत पातळीवर टीका करत आहेत. मात्र, हे सर्व सहन करण्याची ताकद आमच्यात आहे. हे सरकार मुस्लिमविरोधी असल्याचा अपप्रचार केला जात आहे. दुसरीकडे दलितांना भडकवण्याचाही प्रयत्न सुरू आहे, असे आठवले म्हणाले.
संबंधित बातम्या :
पुणे : पीएच.डी. मार्गदर्शकांसाठी सुधारित नियमावली
टीईटी पात्र नसलेल्या शिक्षकांनाही पदोन्नती ; एनसीटीईच्या आदेशाला केराची टोपली
डाव्या हातावरच का बांधतात घड्याळ? जाणून घ्या
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी सगळ्यांना जागे केले आहे. माझ्या पक्षाचा त्यांना पाठिंबा असून, त्यांनी आपल्या मागणीत बदल करावा. ओबीसीतून न देता वेगळा प्रवर्ग तयार करावा. स्वतंत्र ओबीसीची यादी तयार करावी. तो अधिकार राज्य सरकारला आहे. सरकारने तसा निर्णय घेऊन आम्हाला पाठवावा. तमिळनाडूच्या धर्तीवर असा निर्णय घेतला, तर प्रश्न सुटेल, असेही आठवले म्हणाले. मंत्री छगन भुजबळ म्हणतात, मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही. फक्त ओबीसीमध्ये ते नको. त्यामुळे भुजबळ आणि जरांगे यांनी एकत्र येऊन हा वाद मिटवावा. शरद पवार आणि अजित पवार हे मराठा कुटुंबातील आहेत. पण, त्यांच्याबद्दल जे कोणी काही सांगत आहेत, त्यात तथ्य नाही, असेही आठवले यांनी सांगितले.
The post राहुल गांधींना शून्यावर बाद करणार : रामदास आठवले appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : राजकारणाच्या खेळात तयारी करून खेळायचे असते. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी 2024 ची चांगली तयारी केली असून, आम्ही 350 धावा करणार आहोत. विशेष म्हणजे राहुल गांधी यांना मी शून्यावर कॅच ऑऊट करणार आहे, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राजकीय फटकेबाजी केली. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. …
The post राहुल गांधींना शून्यावर बाद करणार : रामदास आठवले appeared first on पुढारी.