हिटरमुळे 5 जणांचे कुटुंब राख; बरेलीत शॉर्टसर्किटने दुर्घटना

बरेली; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशातील बरेली येथे रविवारची सकाळ थरकाप उडविणारी ठरली. एकाच कुटुंबातील 5 जण जळून राख झाल्याचे समोर आले. पती, पत्नी आणि 3 मुलांचा मृतांत समावेश आहे. सकाळी घरातून धूर निघताना दिसला आणि शेजार्यांनी पोलिस, अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा सर्वांचा मृत्यू झाला होता.
पती अजय गुप्ता, पत्नी अनिता आणि दिव्यांश (वय 9), दिव्यांग्या (6) आणि लहान मुलगा दक्ष (3) हे खोलीत हिटर सुरू ठेवून झोपले होते, असेही पंचनाम्यातून समोर आले आहे. दोनपैकी ज्या खोलीत कुटुंब झोपले होते, तीत इलेक्ट्रिकल बोर्डमध्ये 2 हिटर बसवलेले आढळून आले. खोलीला लाकडी दरवाजा आहे. आत कडी नव्हती. रात्री आतून हात घालून हे लोक बाहेरून कुलूप लावत असत. हिटरच्या शॉर्टसर्किटमुळे खोलीत आग लागल्याचे फॉरेन्सिक टीमचे म्हणणे आहे.
The post हिटरमुळे 5 जणांचे कुटुंब राख; बरेलीत शॉर्टसर्किटने दुर्घटना appeared first on Bharat Live News Media.

Home महत्वाची बातमी हिटरमुळे 5 जणांचे कुटुंब राख; बरेलीत शॉर्टसर्किटने दुर्घटना
हिटरमुळे 5 जणांचे कुटुंब राख; बरेलीत शॉर्टसर्किटने दुर्घटना
बरेली; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशातील बरेली येथे रविवारची सकाळ थरकाप उडविणारी ठरली. एकाच कुटुंबातील 5 जण जळून राख झाल्याचे समोर आले. पती, पत्नी आणि 3 मुलांचा मृतांत समावेश आहे. सकाळी घरातून धूर निघताना दिसला आणि शेजार्यांनी पोलिस, अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा सर्वांचा मृत्यू झाला होता. पती अजय गुप्ता, पत्नी अनिता …
The post हिटरमुळे 5 जणांचे कुटुंब राख; बरेलीत शॉर्टसर्किटने दुर्घटना appeared first on पुढारी.
