पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाला आयसीसी वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांत्वनपर ट्विट करताना, सर्व देश संघाच्या पाठीशी यापूर्वीही होता आणि यापुढेही असेल, असे म्हटले आहे.
विश्वचषक स्पर्धेत संघाची गुणवत्ता व संघाचा निर्धार वाखाणण्याजोगा होता, संघाने अतिशय देदीप्यमान खेळ साकारला आणि या सर्वांचा आपल्याला अभिमान आहे, असे मोदी म्हणाले.
अहमदाबाद येथे रविवारी ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा सहा विकेट्सने पराभव करत सहावा वनडे विश्वचषक जिंकला. सलग १० विजयानंतर भारत या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात असतानाही ऑस्ट्रेलिया ने सहाव्यांदा ट्रॉफी वर कब्जा केला.
हेही वाचा :
टीम इंडियाचे स्वप्न भंगले; रोहित-विराटसह भारतीय खेळाडूंना अश्रू अनावर
भारताचे स्वप्नभंग; ऑस्ट्रेलियाची सहाव्यांदा विश्वचषकावर मोहर
कोहली बनला ICC फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
The post ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत…’: पंतप्रधान मोदी appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाला आयसीसी वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांत्वनपर ट्विट करताना, सर्व देश संघाच्या पाठीशी यापूर्वीही होता आणि यापुढेही असेल, असे म्हटले आहे. विश्वचषक स्पर्धेत संघाची गुणवत्ता व संघाचा निर्धार वाखाणण्याजोगा होता, संघाने अतिशय देदीप्यमान खेळ साकारला आणि या सर्वांचा आपल्याला अभिमान …
The post ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत…’: पंतप्रधान मोदी appeared first on पुढारी.