पोलिस कुटुंबे आता राहणार थेट आलिशान फ्लॅटमध्ये

कोल्हापूर : गळक्या चाळीतून आता टकाटक बहुमजली इमारतीत राहण्याचे पोलिसांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कोल्हापूर शहरात तीन ठिकाणी पोलिसांसाठी घरे बांधण्याचे काम सुरू आहे. कित्येक वर्षे कौलारू आणि दगडी चाळीत राहणारी पोलिसांची कुटुंबे आता लवकरच या नव्या आलिशान फ्लॅटमध्ये राहणार आहेत. येत्या सहा महिन्यांत शहरातील सुमारे 500 घरकुलांचे काम पूर्ण होणार आहे. पोलिस गृहनिर्माण … The post पोलिस कुटुंबे आता राहणार थेट आलिशान फ्लॅटमध्ये appeared first on पुढारी.

पोलिस कुटुंबे आता राहणार थेट आलिशान फ्लॅटमध्ये

डॅनियल काळे

कोल्हापूर : गळक्या चाळीतून आता टकाटक बहुमजली इमारतीत राहण्याचे पोलिसांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कोल्हापूर शहरात तीन ठिकाणी पोलिसांसाठी घरे बांधण्याचे काम सुरू आहे. कित्येक वर्षे कौलारू आणि दगडी चाळीत राहणारी पोलिसांची कुटुंबे आता लवकरच या नव्या आलिशान फ्लॅटमध्ये राहणार आहेत. येत्या सहा महिन्यांत शहरातील सुमारे 500 घरकुलांचे काम पूर्ण होणार आहे.
पोलिस गृहनिर्माण महामंडळाच्या वतीने जिल्ह्यात पोलिसांसाठी चार ठिकाणी गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. यातील पोलिस मुख्यालय आणि लक्ष्मीपुरी येथील इमारतींचे काम गतीने सुरू आहे. बुधवार पेठेतील कामानेही आता चांगली गती घेतली आहे.
माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील पोलिसांसाठी एकूण 1728 सदनिकांना मंजुरी दिली होती. त्यापैकी पोलिस मुख्यालय, लक्ष्मीपुरी, बुधवार पेठ आणि इचलकरंजी येथील गृह प्रकल्पांचे काम गतीने सुरू आहे. पोलिसांना सर्व सुविधांनी युक्त सदनिका तयार व्हाव्यात यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही कामे सुरू आहेत. कामांची गती आणखी वाढवली जाणार आहे.
17 मजली बहुमजली इमारत
पोलिस मुख्यालयातील दोन्ही इमारती 17 मजली आहेत. काँक्रिट स्ट्रक्चरपासून या इमारती बनवल्या जात आहेत. यात दगड, विटांचा वापर होत नाही. दोन्ही इमारतीत प्रत्येकी 102 सदनिका आहेत. प्रत्येक सदनिका 525 स्क्वेअर फुटांची आहे. त्यामुळे यापूर्वी दहा बाय दहाच्या दोन खोल्यांमध्ये राहणारी पोलिसांची कुटुंबे आता किमान वन बीएचकेमध्ये नीटनेटकेपणाने राहणार आहेत. नोकरी करत असताना पोलिसांची खूपच धावपळ होत असते. अशा स्थितीत त्यांचे घर कामाच्या ठिकाणाहून जवळ असेल तर पोलिसांचा येण्या-जाण्याचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे पोलिस कर्मचारीही काहीसे निवांत होणार आहेत.
Latest Marathi News पोलिस कुटुंबे आता राहणार थेट आलिशान फ्लॅटमध्ये Brought to You By : Bharat Live News Media.