मराठमोळ्या नथ आणि नऊवारी साडीची दिल्लीकरांना भुरळ!

प्रशांत वाघाये
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर “आवाहन” या उपक्रमात देशातील १५०० महिलांनी सादरीकरण केले होते. यामध्ये मराठी महिलांच्या नथ आणि नऊवारी साडी या मराठमोळ्या पेहरावाने दिल्लीकरांना भुरळ घातली.
प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावरील आवाहन उपक्रमात विविध राज्यांच्या १५०० महिला आपल्या पारंपरिक वेशभुषेसह सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमासाठी सर्व राज्यांची पथके पोहोचली होती.तर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व दिल्लीतील मराठी मंडळींचे व्यासपीठ असलेल्या दिल्ली मराठी प्रतिष्ठान या संस्थेने केले.
दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या सोनाली पाठक, नेहा पाणसे, अर्चना अकोटकर, योगिता कानफाडे, मनिषा घाटे यांनी नऊवारी साडी, नथ आणि भरजरी शेला अशा खास मराठमोळया पेहरावातुन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. या प्रदर्शनात वेगवेगळ्या राज्यांची परिधान संस्कृती दर्शविणारे दालने तयार करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरात या राज्यांचे एकत्रित सादरीकरण होते. आलेल्या प्रेक्षकांमध्ये मराठी पेहरावातील नथ आणि नऊवारी साडीचे वैशिष्ट्ये याबाबत विशेष कुतुहल दिसुन आल्याचे सोनाली पाठक यांनी Bharat Live News Mediaशी बोलताना सांगितले.
The post मराठमोळ्या नथ आणि नऊवारी साडीची दिल्लीकरांना भुरळ! appeared first on Bharat Live News Media.
